स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची 393 वी जयंती यंदा संपूर्ण जगभर शुक्रवार (10 मार्च) रोजी (तिथीनुसार) साजरी करण्यात आली. मावळ तालुक्यातील भडवली या गावातही मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात यंदाचा शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मावळ तालुका हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने आणि शौर्याच्या इतिहासाने पावन झालेला भूप्रदेश. या मावळ प्रांतातील भडवली हे देखील ऐतिहासिक गाव. इथेही सालाबादप्रमाणे गावातील सर्व ग्रामस्थ नागरिक यांनी एकत्र येत शिवजयंती मोठ्या थाटात साजरी केली. सर्वप्रथम किल्ले लोहगड इथून गावातील युवा शिवभक्तांनी शिवज्योत आणली. त्यानंततर शिवज्योतीचे गावात आगमन, पुजन झाले आणि शिवजन्मोत्सवाला सुरुवात झाली. दिवसभर अनेक कार्यक्रमाची रेलचेल इथे होती. ( Shiv Jayanti 2023 celebrated With Various Cultural Programs In Historic Bhadvali Village Of Maval Taluka )
हेही वाचा – मावळमधील जखमी शिवभक्तांच्या उपचारासाठी तत्काळ निधी द्या; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे संबंधित विभागाला आदेश
भडवली गावातील शिवशक्ती ग्रुप भडवली मावळ यांनी संपूर्ण शिवजयंती उत्सव 2023 चे सालाबादप्रमाणे आयोजन आणि नियोजन केले होते. सायंकाळी पाच वाजता श्रींची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यात सर्व अबालवृद्ध सामिल झाले होते. त्यानंतर लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि पोवाडे सादर झाले. रात्री आठ वाजता मावळ भूषण विक्रम भाऊ शेळके यांचे शिवव्याख्यान झाले. त्यानंतर महाप्रसादाच्या वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली.
अधिक वाचा –
– शिंदे सरकारच्या अर्थसंकल्पात मावळमधील ‘या’ रस्त्यांना निधी; खासदार बारणेंनी मानले धन्यवाद!