मावळ तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. मावळ तालुक्यातील नवलाख उंबरे गावाजवळील जाधववाडी धरणात एका 21 वर्षीय तरूणाचा बुडून मृत्यू झाला आहे. आज (शनिवार, 11 मार्च) रोजी ही दुर्दैवी घटना घडली. तळेगाव एमआयडीसी पोलिसांच्या हद्दीतील ही घटना असल्याने या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ( 21 Years Old Youth Drowned In Jadhavwadi Dam At Navlak Umbre In Maval Taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
हमूद अनारुद्दीन खान (वय 21) असे या मृत युवकाचे नाव आहे. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेची टीम आणि NDRF यांनी संयुक्तरित्या तरुणाच्या मृतदेहासाठी शोध मोहिम राबवली होती. वन्यजीव रक्षक मावळ संस्था निलेश संपतराव गराडे, गणेश निसाळ, भास्कर माळी, विकी दौंडकर, अविनाश कार्ले, कुंदन भोसले, शुभम काकडे, सार्थक घुले, अनिश गराडे, गणेश गायकवाड, गणेश ढोरे, कुणाल दाभाडे आदीजण या ऑपरेशनमध्ये सहभागी झाले होते.
अधिक वाचा –
– मावळमधील जखमी शिवभक्तांच्या उपचारासाठी तत्काळ निधी द्या; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे संबंधित विभागाला आदेश
– शिंदे सरकारच्या अर्थसंकल्पात मावळमधील ‘या’ रस्त्यांना निधी; खासदार बारणेंनी मानले धन्यवाद!