संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम येत्या वर्षभरात पूर्ण केले जाईल आणि पुढील वर्षीच्या प्रारंभी त्याचे उद्घाटन होऊन तो सुरू होईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज (शनिवार, 11 मार्च) पुण्यात पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज पुण्यातील देहू आणि आळंदी येथून पंढरपूरला जाणाऱ्या पालखी मार्गांची हवाई पाहणी केली. यामध्ये भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून केले जाणारे काम त्यांनी तपासले. या पार्श्वभूमीवर ते माध्यमांशी संवाद साधत होते. ( Saint Dnyaneshwar Maharaj And Saint Tukaram Maharaj Palkhi Marg To Be Completed By December 2023 Said Union Minister Nitin Gadkari In Pune PC )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
कामाचा आढावा घेतल्यानंतर येत्या मे महिन्यापर्यंत या दोन्ही मार्गांचे मिळून सुमारे 60 ते 70 टक्के काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. वर्षाअखेर हे काम पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले. महाराष्ट्रासाठी वारी आणि पर्यायाने पालखी हा खूप महत्वाचा, अस्थेचा विषय आहे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
देहू, आळंदी, पंढरपूर ही महत्वपूर्ण क्षेत्र आहेत. हा भक्ती मार्ग साधारण नसावा, इथे आम्ही विशेषत्व जपण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. ज्ञानेश्वरीत उल्लेख असलेले वृक्ष लावण्याचा प्रयत्न होत असल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. या मार्गांवरील दुपदरी रस्ते चौपदरी करत आहोत आणि वारकऱ्यांचे पाय भाजू नयेत, याची काळजी घेणार आहोत, अशी माहिती देखील त्यांनी दिली. यासह पुण्यातील चांदणी चौकातील मार्गाचे अपूर्ण काम येत्या एप्रिल अखेर पर्यंत पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
#संत_ज्ञानेश्वर_महाराज आणि #संत_तुकाराम_महाराज पालखी मार्गाचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री @nitin_gadkari यांनी #पुणे येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला. मार्गांवरील दुपदरी रस्ते चौपदरी करणार असल्याची माहितीही यावेळी दिली. pic.twitter.com/0vmSZ5aKUJ
— DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE (@InfoDivPune) March 11, 2023
विशेष माहिती –
संत तुकाराम महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग – 965 जी) हा 130 किमी लांबीचा महामार्ग पुणे जिल्ह्यातील पाटस – बारामती – इंदापूर – अकलुज – बोंडले पर्यंत विकसित करण्यात येत आहे. या मार्गावर एकूण 11 पालखी स्थळे असून वारकऱ्यांच्या सोयीसाठी या सर्व ठिकाणी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.
सदर पालखी मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तसेच आवश्यक त्या ठिकाणी महाराष्ट्रातील संत महात्म्यांची शिल्पे, भित्तीचित्रे, अभंगवाणी आदि सुविधांसह सौंदर्यीकरण करण्यात येईल. यामुळे मार्गाच्या सौंदर्यात भर पडेल तसेच वारकऱ्यांना वारीच्या दरम्यान या सुविधांचा फायदा होईल.
पालखी मार्गावर विशिष्ट प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार असून यामध्ये विशेषतः चंदन, तुळशी, इतर सुगंधित वृक्षांबरोबरच वड, कडुनिंब, पिंपळ, चिंच या सावली देणाऱ्या वनौषधी वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. सद्यस्थितीत रस्त्याच्या मध्यात 57200 व दोन्ही बाजूस मिळून 18840 वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. (माहिती स्त्रोत – पत्र सूचना कार्यालय, मुंबई)
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील ऐतिहासिक भडवली गावात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह शिवजयंती उत्साहात साजरी
– मावळमधील जखमी शिवभक्तांच्या उपचारासाठी तत्काळ निधी द्या; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे संबंधित विभागाला आदेश