वडगांव मावळ येथे दि ७ ते १० मार्च दरम्यान राजे शिव छत्रपती जयंती महोत्सवाची सांगता मोठ्या थाटामाटात आणि विविध कार्यक्रमांनी झाली. या महोत्सवाचे हे ४४ वे वर्ष होते.
शुक्रवार दिनांक १० मार्च रोजी राजे शिव छत्रपती जन्मोत्सव साजरा करण्यात आला. सकाळी लायन्स क्लब ऑफ वडगांव यांचे वतीने शिवज्योतींचे स्वागत करण्यात आले. सहजयोग ध्यानकेंद्र यांचे वतीने शिव जन्मोत्सव संपन्न झाला. सकाळ च्या सत्रात शेकडो बालकांचा सहभाग असलेल्या विविध मैदानी स्पर्धा, वक्तृत्व, निबंध, रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. तसेच विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. ( 393 Birth Anniversary Of Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Celebrated In Vadgaon City Maval Taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सायंकाळी राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक संपन्न झाली त्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन मावळ लोकसभा मतदारसंघाचे संसदरत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते व गौरवण्यात आले. याप्रसंगी पोलीस निरीक्षक विलासराव भोसले, भंडारा डोंगर दशमी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद उपस्थित होते.
1. राजमाता जिजाऊ पुरस्कार – श्रीमती कृष्णाबाई आनंदराव काशीद
2. सांप्रदायिक भूषण पुरस्कार – हभप संतोष महाराज घनवट
3. कर्तव्यदक्ष पुरस्कार – मधुसूदन बर्गे (तहसीलदार मावळ)
4. कृषिनिष्ठ पुरस्कार – मुकुंद बबन ठाकर
5. उद्योगरत्न पुरस्कार – दत्तात्रय विठ्ठलराव कुडे
6. आदर्श सरपंच – अश्विनी ज्ञानेश्वर गुंड
खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी आपल्या मनोगतात शिवजयंती उत्सव समितीच्या कार्याचे कौतुक केले आणि पुढील काळात देखील असेच सामाजिक उपक्रम राबवावेत अशी आशा व्यक्त केली. शिवजयंती उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव म्हाळसकर यांनी आपल्या मनोगतात पुरस्कारार्थी यांच्या जीवनपटाचा तसेच त्यांच्या कार्याचा गोषवारा विशद करत असतांना शिवजयंती उत्सव समितीच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
स्वागत मा नगरसेवक आणि कार्यक्रम प्रमुख श्रीधर चव्हाण आणि अनंता कुडे यांनी केले .अध्यक्ष दिनेश ढोरे यांनी प्रास्ताविक केले ज्यात त्यांनी शिवजयंती उत्सव समितीच्या ४ दिवसांमध्ये झालेल्या कार्यक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन मा नगरसेवक भूषण मुथा, नगरसेवक व कार्याध्यक्ष रवींद्र म्हाळसकर, युवा मोर्चा विनायक भेगडे यांनी केले. ४ दिवसीय कार्यक्रमांचे आभार प्रदर्शन अनुक्रमे राणीताई म्हाळसकर, कार्यक्रम प्रमुख सोमनाथ ढोरे, अतुल म्हाळसकर यांनी केले.
संस्थापक अध्यक्ष भास्करराव म्हाळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष व गटनेते दिनेश ढोरे, कार्याध्यक्ष व नगरसेवक रवींद्र म्हाळसकर, कार्यक्रम प्रमुख सोमनाथ ढोरे व मा नगरसेवक श्रीधर चव्हाण, उपाध्यक्ष प्रशांत चव्हाण, दीपक कुडे, सागर भिलारे, शरद मोरे, खजिनदार अतुल म्हाळसकर, सह खजिनदार अमोल ठोंबरे, गणेश हिंगे, सरचिटणीस कल्पेश भोंडवे, सह सरचिटणीस दीपक भालेराव, हरीश दानवे, सुरेंद्र भिलारे, ओंकार शिंदे, मकरंद बवरे, संदीप म्हाळसकर, शेखर वहिले, रमेश ढोरे, महेंद्र बा. म्हाळसकर, कुलदीप ढोरे, संतोष म्हाळसकर, चंद्रशेखर म्हाळसकर, अतिष ढोरे, महेंद्र अ. म्हाळसकर, विकी म्हाळसकर, संतोष भालेराव, केदार बवरे, सौरभ पायगुडे, महेश सावंत आणि संयोजन समिती, महिला संयोजन समिती आदींनी नियोजन केले.
अधिक वाचा –
– राजे शिवछत्रपती जयंती महोत्सव निमित्त वडगावात जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा, पाहा विजेत्यांची यादी । Vadgaon Maval
– धक्कादायक! ठाकरवस्तीतील गणपती मंदिरात मोठी चोरी, परिसरात संतापाचे वातावरण । Talegaon Dabhade