वडगाव शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने वडगाव नगरपंचायत सीईओ प्रविण निकम यांना वडगाव नगरपंचायत हद्दीतील नागरिकांना वाढीव शास्ती कर माफ व्हावा आणि ग्रामपंचायत काळातील बांधकामे नियमित करण्याचे निवेदन देण्यात आले. ( Vadgaon BJP Statement To Nagar Panchayat CEO To Demand Waive off In Penalty Tax )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
“मार्च 2018 रोजी वडगाव ग्रामपंचायत चे रूपांतर नगरपंचायत मध्ये झाल्यामुळे नगर विकास खात्याच्या नियमास अधिम राहून आपण कर आकारणी मध्ये बदल निश्चित करून कर आकारणी केली आहे. परंतु वडगाव शहर मधील सर्व मिळकत धारक यांना आपल्या चुकीच्या कर आकारणी सर्वेक्षणामुळे वाढीव कर लागून आला आहे.”
“सन 2016 पर्यंत वडगाव शहराकरिता पीएमआरडी च्या नव्हे तर ग्रामपंचायत च्या परवानगीने बांधकामे होत होती. तरी ग्रामपंचायत काळातील करा सहित थकीत कर हा मिळकत धारकांना शास्ती कर म्हणून आकारला आहे. हे चुकीचं असून, शासनाच्या नवीन जीआर नुसार शास्तीकर माफ व्हावा व वडगाव गावठाण हद्द वाढलेले असून त्या पद्धतीने काही मिळकत धारकांचे बेकायदेशीर असलेले बांधकाम अधिकृत करून घेऊन नियमित करावं,” अशी मागणी भाजपाच्या वतीने करण्यात आली.
“ही वाढीव चुकीची कर आकारणी दुरुस्त करून मिळकत धारकांना दिलासा द्यावा. यामध्ये आपण वसुलीच्या कारणास्तव अनेक लोकांचे नळ कनेक्शन तोडत आहात हे सर्व बेकायदेशीर असून आपण नागरिकांना मूलभूत गरजे पासून वंचित करत आहात. लवकरात लवकर आपण या बाबतीत खुलासा करून नागरिकांचे होणारे नुकसान टाळावे. सदर निवेदनाचा विचार गांभीर्यपूर्वक करून कर आकारणी दुरुस्त करावी आणि शास्ती कर माफ करावा अन्यथा नागरिकांच्या असंतोषाच्या कारणास्तव आम्ही वडगाव शहर भाजपा मोठे जनआंदोलन उभे करून नगरपंचायत कार्यालयावर निदर्शन मोर्चा काढू,” असा इशारा देखील यावेळी देण्यात आला.
निवेदन देताना वडगाव शहर भाजपाचे अध्यक्ष आनंता कुडे, संघटन मंत्री किरण भिलारे, गटनेते दिनेश ढोरे, विरोधी पक्षनेत्या अर्चना म्हाळसकर, नगरसेवक प्रविण चव्हाण, किरण म्हाळसकर, रविंद्र म्हाळसकर, मा सरपंच संभाजी म्हाळसकर, युवक अध्यक्ष विनायक भेगडे, शरद मोरे, संतोष म्हाळसकर, हरिष दानवे आदीजन उपस्थित होते.
अधिक वाचा –
– मुख्यमंत्री शिंदेंनी व्हिडिओ कॉलद्वारे साधला मावळ तालुक्यातील जखमी शिवभक्तांशी संवाद – पाहा व्हिडिओ
– मोरया महिला प्रतिष्ठान तर्फे घरकाम करणाऱ्या महिला भगिनींचा सन्मान