अरुणाचल प्रदेशच्या मंडला डोंगराळ भागाजवळ भारतीय सैन्याचे चिता हेलिकॉप्टर आज (गुरुवार, 16 मार्च) सकाळच्या सुमारास अपघातग्रस्त झाले होते. यातील पायलट आणि सहवैमानिक यांच्या शोधासाठी तत्काळ सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले. प्राप्त माहितीनुसार, अपघातातील पायलट आणि सहवैमानिक ठार झाले असून हेलिकॉप्टरचे अवशेष मंडलाच्या पूर्वेकडील बांगलाजाप गावाजवळ सापडले आहेत. ( 2 Pilots Killed As Indian Army Helicopter Crashes In Arunachal Pradesh Wreckage Found )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग जिल्ह्यातील मंडलाजवळ गुरुवारी (दिनांक 16 मार्च) रोजी सकाळच्या सुमारास भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून अपघात झाला होता. वैमानिक – लेफ्टनंट कर्नल व्हीव्हीबी रेड्डी आणि मेजर जयंत ए बेपत्ता असल्याची माहिती समोर आल्यानंतर तत्काळ सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले. सकाळी साधारण सव्वानऊ वाजता विमानाचा एअर ट्रॅफिक कंट्रोलरशी संपर्क तुटला होता, अशी माहिती लष्कराने दिली.
General Manoj Pande #COAS and All Ranks of #IndianArmy salute the supreme sacrifice of Lt Col VVB Reddy & Maj Jayanth A, in the line of duty at #ArunachalPradesh & express deepest condolences to the bereaved families. https://t.co/6wVOSoSVGt
— ADG PI – INDIAN ARMY (@adgpi) March 16, 2023
भारतीय लष्कराचे पाच शोध दल, सशस्त्र सीमा बल आणि इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस (आयटीबीपी) यांच्या मदतीने तत्काळ शोधकार्य सुरु करण्यात आले होते. त्यानंतर या अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचे अवशेष मंडलाच्या पूर्वेकडील बांगलाजाप गावाजवळ सापडले आहेत. तसेच, अपघातात हेलिकॉप्टरचे पायलट आणि सहवैमानिक ठार झालेत, अशी माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Arunachal Pradesh | A pilot and co-pilot died after their Cheetah helicopter flying on an operational sortie crashed; the wreckage of the aircraft was found near Village Banglajaap East of Mandala. Court of enquiry being ordered: PRO Defence Guwahati pic.twitter.com/awHqFeHaa7
— ANI (@ANI) March 16, 2023
रोहित राजबीर सिंग (पोलीस अधीक्षक, विशेष तपास कक्ष (SIC)) यांनी स्पष्ट केले की, गावकऱ्यांना दिरांगमध्ये क्रॅश झालेले हेलिकॉप्टर जळलेले आढळले आणि त्यांनी जिल्हा अधिकार्यांना माहिती दिली. “दिरांग येथील बंगजालेप येथील ग्रामस्थांनी हेलिकॉप्टर शोधून काढले. ते अजूनही जळत आहे,” असे श्री सिंग म्हणाले. तसेच आता या अपघाताची चौकशी देखील सुरु करण्यात आली असून अपघाताचे कारण लवकरच समोर येईल.
अधिक वाचा –
– अत्यंत दुःखद बातमी! मावळ तालुक्यातील ‘त्या’ जखमी शिवभक्ताचा उपचारादरम्यान मृत्यू, शिलाटणे गावावर शोककळा
– तळेगावात रविवारी पिंकेथॉन रॅली, अभिनेता सिद्धार्थ चांदेकरच्या हस्ते होणार उद्घाटन, 814 महिलांची नोंदणी