व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, September 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

दुर्दैवी घटना! अरुणाचल प्रदेशात भारतीय सैन्याच्या चिता हेलिकॉप्टरचा अपघात, दोन जवान शहीद, शोधकार्यानंतर अवशेष सापडले

अरुणाचल प्रदेशच्या मंडला डोंगराळ भागाजवळ भारतीय सैन्याचे चिता हेलिकॉप्टर आज (गुरुवार, 16 मार्च) सकाळच्या सुमारास अपघातग्रस्त झाले होते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 16, 2023
in देश-विदेश
Indian-Army-Cheetah-Helicopter-Crashes

Photo Courtesy : Twitter


अरुणाचल प्रदेशच्या मंडला डोंगराळ भागाजवळ भारतीय सैन्याचे चिता हेलिकॉप्टर आज (गुरुवार, 16 मार्च) सकाळच्या सुमारास अपघातग्रस्त झाले होते. यातील पायलट आणि सहवैमानिक यांच्या शोधासाठी तत्काळ सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले. प्राप्त माहितीनुसार, अपघातातील पायलट आणि सहवैमानिक ठार झाले असून हेलिकॉप्टरचे अवशेष मंडलाच्या पूर्वेकडील बांगलाजाप गावाजवळ सापडले आहेत. ( 2 Pilots Killed As Indian Army Helicopter Crashes In Arunachal Pradesh Wreckage Found )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग जिल्ह्यातील मंडलाजवळ गुरुवारी (दिनांक 16 मार्च) रोजी सकाळच्या सुमारास भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून अपघात झाला होता. वैमानिक – लेफ्टनंट कर्नल व्हीव्हीबी रेड्डी आणि मेजर जयंत ए बेपत्ता असल्याची माहिती समोर आल्यानंतर तत्काळ सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले. सकाळी साधारण सव्वानऊ वाजता विमानाचा एअर ट्रॅफिक कंट्रोलरशी संपर्क तुटला होता, अशी माहिती लष्कराने दिली.

General Manoj Pande #COAS and All Ranks of #IndianArmy salute the supreme sacrifice of Lt Col VVB Reddy & Maj Jayanth A, in the line of duty at #ArunachalPradesh & express deepest condolences to the bereaved families. https://t.co/6wVOSoSVGt

— ADG PI – INDIAN ARMY (@adgpi) March 16, 2023

भारतीय लष्कराचे पाच शोध दल, सशस्त्र सीमा बल आणि इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस (आयटीबीपी) यांच्या मदतीने तत्काळ शोधकार्य सुरु करण्यात आले होते. त्यानंतर या अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचे अवशेष मंडलाच्या पूर्वेकडील बांगलाजाप गावाजवळ सापडले आहेत. तसेच, अपघातात हेलिकॉप्टरचे पायलट आणि सहवैमानिक ठार झालेत, अशी माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Arunachal Pradesh | A pilot and co-pilot died after their Cheetah helicopter flying on an operational sortie crashed; the wreckage of the aircraft was found near Village Banglajaap East of Mandala. Court of enquiry being ordered: PRO Defence Guwahati pic.twitter.com/awHqFeHaa7

— ANI (@ANI) March 16, 2023

रोहित राजबीर सिंग (पोलीस अधीक्षक, विशेष तपास कक्ष (SIC)) यांनी स्पष्ट केले की, गावकऱ्यांना दिरांगमध्ये क्रॅश झालेले हेलिकॉप्टर जळलेले आढळले आणि त्यांनी जिल्हा अधिकार्‍यांना माहिती दिली. “दिरांग येथील बंगजालेप येथील ग्रामस्थांनी हेलिकॉप्टर शोधून काढले. ते अजूनही जळत आहे,” असे श्री सिंग म्हणाले. तसेच आता या अपघाताची चौकशी देखील सुरु करण्यात आली असून अपघाताचे कारण लवकरच समोर येईल.

अधिक वाचा –

– अत्यंत दुःखद बातमी! मावळ तालुक्यातील ‘त्या’ जखमी शिवभक्ताचा उपचारादरम्यान मृत्यू, शिलाटणे गावावर शोककळा
– तळेगावात रविवारी पिंकेथॉन रॅली, अभिनेता सिद्धार्थ चांदेकरच्या हस्ते होणार उद्घाटन, 814 महिलांची नोंदणी


dainik maval jahirat

Previous Post

अत्यंत दुःखद बातमी! मावळ तालुक्यातील ‘त्या’ जखमी शिवभक्ताचा उपचारादरम्यान मृत्यू, शिलाटणे गावावर शोककळा

Next Post

रविंद्र भेगडे यांचे 2024 च्या विधानसभा निवडणूकीच्या उमेदवारीबाबत स्पष्ट मत – व्हिडिओ

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Ravindra-Bhegade-News

रविंद्र भेगडे यांचे 2024 च्या विधानसभा निवडणूकीच्या उमेदवारीबाबत स्पष्ट मत - व्हिडिओ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.