वडगाव मावळ येथील ओमकार गॅस एजन्सीच्या वतीने वडगाव येथील नागरिकांना एचपी गॅसचे वाटप केले जाते. परंतू गेल्या पंधरा-वीस दिवसापासून ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सध्या दहावीच्या व शालेय परीक्षा चालू आहेत त्यामुळे विशेष करून महिलांना जास्त त्रास सहन करावा लागत आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
घरपोच सिलेंडर देखील येत नाहीये. एजन्सीसोबत कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. तसेच काही ज्येष्ठ नागरिक घरी असतात त्यांना जाणे येणे शक्य होत नाही. तसेच काही लोकांकडे वाहने नाहीये. त्यामुळे त्यांना एजन्सी ठिकाणी जाऊन सिलिंडर आणता येत नाही, अशा अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. ( Deliver Gas Cylinders To Customers Home In Vadgaon Demand By NCP Workers Cell )
त्यामुळे, वडगाव राष्ट्रवादी कामगार सेलचे अध्यक्ष तुषार वहिले आणि नागरिकांच्या वतीने सदर गॅस एजन्सीला संपर्क करून निवेदन दिले आहे. ज्यात वरील मागण्या करण्यात आल्या आहेत. सदर गॅस एजन्सी मार्फत ग्राहकांना घरपोच सिलेंडर देण्यात यावा तसेच कामगारांची संख्या वाढवावी, तसेच कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी त्या कामगारांना गॅस एजन्सी चे ओळखपत्र द्यावे. तसेच गॅस एजन्सीचा संपर्क भ्रमणध्वनी जाहीर करावा, वरील मागण्याचीं तात्काळ अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी वडगाव शहर राष्ट्रवादी कामगार सेनेचे अध्यक्ष तुषार वसंतराव वहिले यांनी केली आहे.
अधिक वाचा –
– कामशेतमध्ये महावितरणचा अजब कारभार; ग्राहकाचे वीज बिल थकीत असतानाही त्याच जागी केले नवीन वीज जोडणी कनेक्शन
– वडगांव नगरपंचायत हद्दीतील विविध भागात विकासकामांना सुरुवात