मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान फंडातून आणि नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या विशेष प्रयत्नांने वडगाव नगरपंचायत हद्दीतील केशवनगर प्रभाग क्रमांक 1 मध्ये सुमारे 1 कोटी 70 लाख रुपयांच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजनाचा शुभारंभ नुकताच झाला होता. त्यातील स्वप्नपूर्ती अपार्टमेंट ते पवार वस्तीपर्यंत रस्ता डांबरीकरण काम दोन दिवसापूर्वी पूर्ण करण्यात आले आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
याव्यतिरीक्त केशवनगर रेल्वे गेट ते वडगाव खापरे ओढा हद्दीपर्यंत बंदिस्त गटरचे काम पूर्ण झाले असून येथील रस्ता डांबरीकरणचे काम येत्या काही दिवसात पूर्ण केले जाईल. केशवनगर मधील विकासकामांना प्रत्यक्ष सुरुवात होत असल्याने संबधीत रस्त्यांची कामे उच्च दर्जाची करावीत अशा सूचना संबधित ठेकेदाराला देण्यात दिल्या आहेत. ( Development Works Started In Various Areas Within Vadgaon Nagar Panchayat Limits )
अधिक वाचा –
– वडगाव शहराला ‘सुरक्षेच्या तिसऱ्या डोळ्याची’ गरज; भाजपा महिला मोर्चाचे नगरपंचायत आणि पोलिस प्रशासनाला निवदेन
– सुदुंबरे गावात आधार सेवा कॅम्प संपन्न; तब्बल 1124 नागरिकांनी घेतला आधार सबंधित विविध सेवांचा लाभ