व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, September 5, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कामशेतमध्ये महावितरणचा अजब कारभार; ग्राहकाचे वीज बिल थकीत असतानाही त्याच जागी केले नवीन वीज जोडणी कनेक्शन

कामशेत हद्दीतील ताजे गावातील गट नंबर 622, 623 मधील प्लॉटिंग मध्ये वडगाव उपविभाग अभियंता यांनी पाहणी केली असता त्यांच्या असे निदर्शनात आले की ताजे येथील वरील गट क्रमांक मध्ये ग्राहकाची वीज बिलाची 81,520 रुपयांची थकबाकी असताना नवीन वीज जोड कनेक्शन देण्यात आले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 18, 2023
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर
Mahavitaran

Mahavitaran


(दैनिक मावळ प्रतिनिधी) कामशेत हद्दीतील ताजे गावातील गट नंबर 622, 623 मधील प्लॉटिंग मध्ये वडगाव उपविभाग अभियंता यांनी पाहणी केली असता त्यांच्या असे निदर्शनात आले आहे की ताजे येथील वरील गट क्रमांक मध्ये ग्राहकाची वीज बिलाची 81,520 रुपयांची थकबाकी असताना देखील तिथे नवीन वीज जोड कनेक्शन देण्यात आले आहे.  ( New Connection Given When Power Bill Is Outstanding Poor Management of Mahavitran Kamshet branch )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

त्यामुळे महावितरण कंपनीच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले आहे. तसेच कंपनीचा महसूल बुडवला असल्याचे देखील निदर्शनात येत आहे. यामुळे वडगाव मावळ येथील उपकार्यकारी अभियंता यांनी कामशेत विभागाच्या प्रमोद महाजन यांना स्मरण पत्र लिहून याबाबत खुलासा करण्याचे सांगितले आहे. याबाबत वारंवार प्रमोद महाजन यांना पत्र लिहून खुलासा करण्यास सांगितले असताना देखील प्रमोद महाजन हे खुलासा करत नसल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, यासाठी देखील वडगाव उपविभागीय कार्यकारी अभियंता विवेक सूर्यवंशी यांनी राजगुरुनगर कार्यकारी अभियंता यांना देखील कळवले आहे.

कामशेत विभागाचे महावितरण प्रमुख प्रमोद महाजन यांच्या बाबत नागरिकांकडून अनेक तक्रारी असून नागरिकांशी उद्धट बोलणे, महावितरण कार्यालयात नागरिकांच्या समस्या न सोडवणे, अरेरावी करणे त्याचप्रमाणे चुकीच्या पद्धतीने नागरिकांना महावितरणचा महसूल बुडून कनेक्शन देणे अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कामशेत मधील नागरिक करताना दिसत आहे.

कामशेत परिसर आणि आजूबाजूच्या गावांमध्ये वाढती लोकसंख्या पाहता दिवसेंदिवस महावितरणचे अधिकारी व त्यांनी ठेवलेल्या काही कंत्राटी लोकांकडून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महावितरणचे अधिकारी कामशेत शहरातील नागरिकांना तसेच आजूबाजूच्या लगत असणाऱ्या गावातील रहिवाशांना जर नवीन कनेक्शन हवे असल्यास ते देण्यास विलंब करतात.

महावितरण चा महसूल बुडवून चुकीच्या पद्धतीने ग्राहकांना नवीन कनेक्शन देणाऱ्या महावितरणच्या अधिकारी प्रमोद महाजन यांच्यावर कारवाई कारवाई करावी, अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे. कामशेत महावितरण कार्यालयामध्ये अनेक अनागोंदी कारभार चालू असल्याचे नागरिकांकडून कळत आहे. त्यामुळे या कार्यालयातील अधिकाऱ्याची चौकशी केल्यास अनेक बनावट कनेक्शन दिल्याचे समोर येऊ शकते अशी चर्चा नागरिक करत आहेत. त्यामुळे या कार्यालयाची व अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी याबाबत लवकरच कामशेत शहरातील नागरिक मावळचे आमदार सुनील शेळके व महावितरण चे अधिकारी यांना निवेदन देणार आहेत.( New Connection Given When Power Bill Is Outstanding Poor Management of Mahavitran Kamshet branch )

हेही वाचा – वडगाव शहराला ‘सुरक्षेच्या तिसऱ्या डोळ्याची’ गरज; भाजपा महिला मोर्चाचे नगरपंचायत आणि पोलिस प्रशासनाला निवदेन

प्रमोद महाजन (महावितरण शाखा कामशेत प्रमुख) : ग्राहकाची वीज बिलाची थकबाकी असताना त्याच जागी नवीन वीज कनेक्शन कोणी दिले याबाबत आपण माहिती घ्यावी व या संपूर्ण प्रकरणाची माहिती आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घ्यावी मी याबाबत काही बोलणार नाही

विवेक सूर्यवंशी (उपकार्यकारी अभियंता वडगाव मावळ) : ग्राहकाची वीज बिलाची थकबाकी असताना त्याच जागी नवीन जोडणी केल्याचे प्रथम दर्शनी दिसून आले असल्याने यातून कंपनीच्या नियमांचं उल्लंघन झाल्याचे दिसत आहे. तसेच कंपनीचा महसूल देखील बुडवला गेल्याचा दिसत असल्याने प्रमोद महाजन यांना खुलासा करण्यासाठी स्मरणपत्र पाठवण्यात आले असून त्यावर कारवाई करण्यासाठी कार्यकारी अभियंता राजगुरुनगर यांना देखील पत्र देण्यात आले आहे.

अधिक वाचा –

– धोकादायकरित्या रस्त्याच्या बाजूला उभ्या केलेल्या ट्रकला दुचाकीची धडक; 2 दुचाकीस्वार ठार, मिंडेवाडीजवळील घटना
– येळसे गावातील तलाठी कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन संपन्न! आमदार सुनिल शेळकेंच्या पाठपुराव्याला यश


dainik maval jahirat

Previous Post

वडगांव नगरपंचायत हद्दीतील विविध भागात विकासकामांना सुरुवात

Next Post

नागरी समस्या : ग्राहकांना घरपोच गॅस सिलिंडर देण्याची मागणी, नागरिकांच्या वतीने राष्ट्रवादी कामगार सेलचे एजन्सीला निवेदन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Deliver-Gas-Cylinders-To-Customers-Home

नागरी समस्या : ग्राहकांना घरपोच गॅस सिलिंडर देण्याची मागणी, नागरिकांच्या वतीने राष्ट्रवादी कामगार सेलचे एजन्सीला निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.