व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महिलांनी आरोग्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज : अभिनेता सिद्धार्थ चांदेकर । Talegaon Dabhade News

तळेगाव दाभाडे नगरपरिषद अंको लाईफ कॅन्सर सेंटर व रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या फाईट अगेन्स कॅन्सर "रोटरी सिटी पिंकेथॉन" या जनजागृती रॅलीस प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ चांदेकर हे उपस्थित होते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 21, 2023
in लोकल, ग्रामीण, महाराष्ट्र, शहर
Actor-Siddharth-Chandekar-At-Talegaon-Dabhade

Photo Courtesy : Kiran Oswal


महिलांनी आरोग्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावे व आपणास स्वतःला सुदृढ बनवून भारताला सुदृढ बनवावे, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांनी रोटरी सिटी या रॅलीच्या आयोजित कार्यक्रमाप्रसंगी काढले.

तळेगाव दाभाडे नगरपरिषद अंको लाईफ कॅन्सर सेंटर व रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या फाईट अगेन्स कॅन्सर “रोटरी सिटी पिंकेथॉन” या जनजागृती रॅलीस प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ चांदेकर हे उपस्थित होते. ( Pinkathon Rally Organized For Cancer Awareness At Talegaon Dabhade Inauguration Of Marathon By Marathi Actor Siddharth Chandekar )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम घेण्यात आल्याचे रोटरी सिटी चे अध्यक्ष दीपक फल्ले यांनी सांगितले. रॅलीच्या सुरुवातीला माझी वसुंधरा याची सर्वांना शपथ देण्यात आली व कॅन्सर साठी जनजागृती करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या. या रॅलीचा शुभारंभ प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ चांदेकर रोटरीचे जिल्हा संचालक नितीन ढमाले यांच्या शुभहस्ते आणि तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे अँको लाइफ कॅन्सर सेंटरचे डॉ मनोज तेजानी, दिलीप पारेख, विलास काळोखे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

हेही वाचा – ‘निसर्ग हाचि वर्ग, एकमेव स्वर्ग । सुशोभुया मार्ग सेवाभावे’, श्री तीर्थक्षेत्र स्वच्छता अधिवेशनास श्रीक्षेत्र देहू येथून प्रारंभ

कॅन्सर विरोधी लढ्यामध्ये आपण सर्वांनी हातात हात घालून काम केले पाहिजे, असे प्रतिपादन मुख्याधिकारी श्री विजयकुमार सरनाईक यांनी केले. तर जिल्हा संचालक रोटरियन नितीन ढमाले यांनी रोटरी डिस्ट्रिक्ट कडून कॅन्सर जनजागृतीसाठी रोटरी सिटीला सहकार्य केले जाईल असे प्रतिपादन केले. सदर रॅली मध्ये 1000 पेक्षा अधिक महिलांनी भाग घेऊन प्रचंड प्रतिसाद दिला. या रॅली प्रसंगी डॉ अजय ढाकेफळकर,सुरेश शेंडे, किरण ओसवाल,संजय मेहता,सुनंदा वाघमारे हे प्रमुख उपस्थित होते.

सर्व महिलांसाठी पंधरा लकी ड्रॉ काढण्यात आले यामध्ये “संकेत मानाची पैठणी” सौ वैशाली थोरात यांना मिळाली. याप्रसंगी थाय बॉक्सिंग मध्ये संपूर्ण देशात मावळ तालुक्याचे नाव उज्वल करणारी तृप्ती निंबळे हीचा विशेष सन्मान करण्यात आला. तर कॅन्सर सारख्या रोगावर मात करणाऱ्या काही महिलांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेश्मा फडतरे यांनी केले, तर प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख डॉक्टर धनश्री काळे यांनी केले आभार शाहीन शेख यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शरयू देवळे, प्रदीप मुंगसे, डॉ विद्या पोतले, संतोष परदेशी, प्रशांत ताय, प्रदीप टेकवडे, आनंद पूर्णपात्रे, राजेंद्र कडलक, संजय चव्हाण अविनाश नांगरे, वैभव तनपुरे, हर्षद झव्हेरी आणि सर्व रोटरी सदस्य यांनी केले.

अधिक वाचा –

– वन्यजीवांसाठी स्वर्ग असलेला तालुका; मावळच्या पक्षी वैभवात आणखी एक मानाचा तुरा, नक्की वाचा
– प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! लोणावळा ते अलिबाग एसटी बस सुरू, ‘या’ मार्गावरील बससेवाही पूर्ववत, पाहा वेळापत्रक


dainik maval jahirat

Previous Post

‘निसर्ग हाचि वर्ग, एकमेव स्वर्ग । सुशोभुया मार्ग सेवाभावे’, श्री तीर्थक्षेत्र स्वच्छता अधिवेशनास श्रीक्षेत्र देहू येथून प्रारंभ

Next Post

तुम्हीही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केलीये? मग ही बातमी नक्की वाचा, अन्यथा होईल नुकसान…

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Dainik-Maval-Paisa-Pani

तुम्हीही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केलीये? मग ही बातमी नक्की वाचा, अन्यथा होईल नुकसान...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vehargaon Dahivali Villagers rasta roko demand cancellation of proposed ropeway project at Ekvira Devi temple

वेहरगाव, दहिवली ग्रामस्थांचा विविध मागण्यांसाठी रास्ता रोको ; एकविरा देवी मंदिर येथील प्रस्तावित रोप-वे प्रकल्प रद्द करण्याची मागणी

August 31, 2026
Narali-Poornima

नारळी पौर्णिमा विशेष : “सण आयलाय गो, आयलाय गो नारली पुनवेचा…” । कोळीबांधव समुद्रात नारळ का सोडतात? जाणून घ्या

August 28, 2026
Maval Cricketer Sampat Satkar passes away gloom descends on sports world

मावळचे ‘क्रिकेटरत्न’ संपत सातकर यांचे निधन, क्रीडा विश्वावर शोककळा

August 28, 2026
Tata Group called upon to assist flood victims in Lonavala meeting held in presence of MLA Sunil Shelke

लोणावळ्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी टाटा कंपनीचे अधिकारी, जिल्हाधिकारी आणि आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक

August 28, 2026
Horrific accident within limits of Waksai village near Karla Phata Maval speeding car plunges into astream two dead

कार्ला फाट्याजवळील वाकसई गावाच्या हद्दीत भीषण अपघात ; भरधाव कार थेट ओढ्यात कोसळली, दोघांचा मृत्यू

August 28, 2026
Akhand Wari Lifetime Achievement Award 2026 by Kamshet Rural Journalists Association Maval

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी ‘अखंड वारी जीवनगौरव पुरस्कार- २०२६’चे वितरण

August 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.