म्युचल फंडामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये एसआयपी द्वारे किंवा एक रकमी गुंतवणूक केली असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
एस.आय.पी. सुरू करताना किंवा एक रकमी गुंतवणूक करताना बऱ्याचदा गुंतवणूकदार नॉमिनी देणे टाळतात किंवा नंतर बघू यात असे म्हणून लांबणीवर टाकतात. तुम्ही जर असे केले असेल तर ते तुम्हाला महागात पडू शकते. भारत सरकारने जारी केलेल्या नव्या नियमानुसार तुम्हाला म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीसाठी नॉमिनी ऍड करणे बंधनकारक आहे. ही प्रक्रिया तुम्हाला 31 मार्च 2023 अगोदर पूर्ण करावी लागणार आहे. असे न केल्यास तुमची म्युच्युअल फंडातील आजवर केलेली गुंतवणूक फ्रीज होऊ शकते. ( complete this formality before 31 march if you have invested in mutual fund )
घाई करा..
तुम्ही जर म्युच्युअल फंडात एसआयपी किंवा लम्पसम गुंतवणूक केली असेल आणि नॉमिनी ऍड केला नसेल तर ३१ मार्च २०२३ च्या आत ते करून घ्या. असे न केल्यास तुमची गुंतवणूक फ्रीझ होऊ शकते. pic.twitter.com/KTVcqNK9rc— PaisaPani (@PaisaPani) March 21, 2023
तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली असल्यास तुम्हाला त्या त्या फंडाकडून ईमेल येतो. या ईमेलमध्ये तुमच्या गुंतवणुकीला नॉमिनी ऍड करण्यासाठी एक लिंक दिलेली असते. त्या लिंक वर क्लिक करून अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण करू शकता.
अधिक माहितीसाठी पाहा – पैसापाणीचे यूट्यूब चॅनेल https://www.youtube.com/@PaisaPani
अधिक वाचा –
– महिलांनी आरोग्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज : अभिनेता सिद्धार्थ चांदेकर । Talegaon Dabhade News
– ‘निसर्ग हाचि वर्ग, एकमेव स्वर्ग । सुशोभुया मार्ग सेवाभावे’, श्री तीर्थक्षेत्र स्वच्छता अधिवेशनास श्रीक्षेत्र देहू येथून प्रारंभ
– वन्यजीवांसाठी स्वर्ग असलेला तालुका; मावळच्या पक्षी वैभवात आणखी एक मानाचा तुरा, नक्की वाचा