मावळ तालुक्यातील सुदवडी आणि सुदुंबरे गावातील नळ पाणीपुरवठा योजनांचा भूमीपूजन समारंभ रविवार (दिनांक 26 मार्च) रोजी संपन्न झाला. यासह सुमारे 2 कोटी 57 लाख रुपये निधीतील अंतर्गत रस्ते करणे, सभामंडप बांधणे, गटार बांधणे, क्रीडा साहित्य, वर्ग खोल्या दुरुस्ती, साकव बांधणे अशा विविध विकासकामांचाही भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा रविवारी संपन्न झाला. महिला-भगिनींच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत भूमीपूजन आणि लोकार्पनाचे कार्यक्रम रविवारी ( दिनांक 26 मार्च ) रोजी पार पडले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून सुदवडी पाणी योजनेसाठी सुमारे 3 कोटी 2 लाख रुपये निधी आणि सुदुंबरे पाणी योजनेसाठी 4 कोटी 98 लाख रुपये निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे येथील महिलाभगिनींना डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणण्याची वेळ भविष्यात येणार नाही. ( Bhumi Poojan Ceremony of Tap Water Supply Schemes In Sudavadi And Sudumbare Village Of Maval Taluka Concluded On Sunday )
गावांमध्ये वाढत्या नागरिकीकरणाचा विचार करुनच विकासाचा आलेख कसा उंचावेल यासाठी जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतू विकासकामांमध्ये राजकारण न आणता गावपातळीवरील मतभेद बाजुला ठेवुन स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ यांनी चांगल्या पद्धतीची विकासकामे करुन घ्यावीत, अशी अपेक्षा आमदार सुनिल शेळके यांच्या वतीने मान्यनरांनी व्यक्त केली. सदर कार्यक्रमांना जेष्ठ मान्यवर, आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, पदाधिकारी, महिला-भगिनी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
अधिक वाचा –
– माझी वसुंधरा अभियान : तळेगाव दाभाडे शहरातील स्टेशन तळे परिसरात विद्यार्थ्यांकडून वृक्ष लागवड
– ओवळे गावातील श्री म्हसोबा देवस्थान मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन संपन्न
– धक्कादायक! लोणावळ्यात तीन अल्पवयीन मुलांकडून शाळकरी मुलावर जीवघेणा हल्ला