मावळ तालुक्यातील साळूंब्रे विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी सतिश नारायण राक्षे आणि व्हाईस चेअरमनपदी कलावती आमले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. साळुंब्रे सोसायटीत साळुंब्रे, सांगवडे, गहूंजे, शिरगाव आणि गोडूंब्रे गावांचा समावेश होतो.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
वडगाव मावळ येथे भाजपाच्या पक्ष कार्यालयात साळुंब्रे सोसायटीच्या नवनिर्वाचित संचालकांची बैठक घेण्यात आली. यावेळी सर्वानुमते साळुंब्रे सोसायटीच्या चेअरमनपदी सतिश राक्षे यांची तर व्हाईस चेअरमनपदी कलावती आमले यांची बिनविरोध निवड केली गेली. ( Satish Rakshe Was Elected As Chairman And Kalavati Amle As Vice Chairman Of Salumbre Society Maval )
याप्रसंगी माजी आमदार बाळा भेगडे, मावळ तालुका भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष रविंद्र भेगडे, माजी सभापती गुलाब म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम, सं.तू. स.का संचालक शामराव राक्षे, गोविंद बोडके, किरण भाऊ राक्षे, वडगाव शहर अध्यक्ष अनंता कुडे, बाबुलाल गराडे, बाळासाहेब घोटकुले यांच्यासह सर्व नवनिर्वाचित संचालक उपस्थित होते.
अधिक वाचा –
– येळसे गावातील काळूबाई मंदिर परिसराचे होणार काँक्रिटीकरण, विश्वजीत बारणेंच्या हस्ते भूमीपूजन संपन्न
– देहूतील संत तुकाराम महाराज संस्थानच्या अध्यक्षपदी पुरुषोत्तम महाराज मोरे; अटीतटीच्या निवडणूकीत 9 मतांनी विजयी