मावळ तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. तालुक्यातील आंदर मावळ विभागातील शिरोता वन विभाग अंतर्गत मौजे कुसूर या गावात बिबट्याच्या हल्ल्यात गरीब शेतकऱ्याच्या दोन शेळ्या ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरातील नागरिक आणि गावांत भीतीचे वातावरण पसरले आहे. ( Two Goats Killed In Leopard Attack At Kusur Village Maval Taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मौज कुसूर गावात आज (मंगळवार, 28 मार्च) दुपारी साधारण 1 वाजण्याच्या सुमारास काळूराम बाबू विरणक हे आपल्या बकऱ्या माळावर चारत होते. यावेळी माळावर बकऱ्या चारत असताना अचानक बिबट्याने हल्ला केला. यात काळूराम विरणक यांच्या दोन गर्भवती शेळ्या बिबट्याच्या हल्ल्यात जागीच ठार झाल्या. दोन शेळ्यांचा मृत्यू होणे ही गोष्ट काळूराम यांच्यासारख्या सर्वसाधारण आणि गरीब शेतकऱ्यासाठी मोठे आर्थिक नुकसान आहे. वन्यजीव रक्षक मावळचे निलेश गराडे यांनी दैनिक मावळला ही माहिती दिली.
अधिक वाचा –
– पुण्याच्या वाडिया कॉलेजमध्ये साजरा झाला आगळा वेगळा ‘झू फेस्ट’
– ग्रुप ग्रामपंचायत कल्हाटच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादीचे बुधाजी जागेश्वर बिनविरोध, आमदार शेळकेंनी केले अभिनंदन