मावळ तालुक्यात ( Maval News ) ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत कामे सुरु असलेल्या नळ पाणी पुरवठा योजनांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी आमदार सुनिल शेळके ( MLA Sunil Shelke ) यांनी वडगाव मावळ ( Vadgaon Maval ) इथे आढावा बैठक घेतली होती.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
“धरणांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या आपल्या मावळ तालुक्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी आजपर्यंत त्रास सहन करावा लागला. परंतु भविष्यातील हा त्रास कमी व्हावा याचा विचार करुनच जल जीवन मिशन अंतर्गत तालुक्यात अनेक गावांमध्ये पाणी योजनांची कामे सुरु आहेत. परंतु काही ठिकाणी तांत्रिक अडचणी आल्यामुळे कामांना विलंब होत असल्याचे दिसून येत आहे. या सर्व समस्या सोडवुन योजनांची कामे पूर्ण करण्यावर आगामी काळात भर असणार आहे,” असे आमदार शेळकेंनी सांगितले
तसेच, कळकराई सारख्या दुर्गम भागात पाण्याचा शाश्वत स्त्रोत उपलब्ध नसल्यामुळे पर्याय काढून येथील पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी नक्की प्रयत्न केला जाईल, असा शब्द आमदार शेळकेंनी ग्रामस्थांना दिला. ( Maval Taluka MLA Sunil Shelke Reviewed Jal Jeevan Mission Schemes Of Various Villages At Vadgaon )
यावेळी कळकराई सावळा, खांडशी, वडेश्वर, माऊ, वारु, कुसवली, नागाथली, कुरवंडे, आढले खु., वरसोली, गोवित्री, पांगळोली, नवलाख उंबरे, जाधववाडी, मिंडेवाडी, बधलवाडी, धामणे, वडवली, वळवंती, कोलवडी, भाजगाव या गावातील योजनांच्या कामांची माहिती घेतली. सदर बैठकीला आमदार सुनिल शेळके यांच्यासमवेत, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, ग्रामीण पाणीपुरवठा उप अभियंता अरविंद चाटे, शाखा अभियंता जयदीप अग्निहोत्री, गितेश मिंडे, सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, ठेकेदार आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
अधिक वाचा –
– वराळे इथे हनुमान मंदिर जिर्णोद्धार व कलशारोहण समारंभ संपन्न
– एकविरा देवीच्या उत्सवादरम्यान लोणावळा पोलिसांची मोठी कारवाई! बेकायदा विदेशी मद्यसाठ्यासह 3 जण ताब्यात