जुन्या मुंबई पुणे महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या सांबराचा मृत्यू झाला आहे. अहिरवडे फाट्याजवळ साई सेवाधाम जवळ हा अपघात झाला होता. जखमी सांबराला उपचारासाठी नेण्यात आले, मात्र तत्पुर्वी; त्याचा मृत्यू झाला होता. ( Sambar Deer Dies After Hitting Unknown Vehicle On Old Mumbai Pune Highway In Maval Taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
आज (गुरुवार, 20 मार्च) रोजी सकाळी साधारणे सात-साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. अज्ञात वाहनाच्या धडकेने सांबर गंभीर जखमी झाल्याचे तेथील नागरिकांना आणि वाहनचालकांना दिसले. याबाबत तत्काळ वन्यजीव रक्षक मावळ संस्थेशी संपर्क करुन त्यांना याची माहिती देण्यात आली. वन्यजीव रक्षक मावळ आणि वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी आले. मात्र सांबर अतिगंभीर जखमी अवस्थेत होते, अशी माहिती निलेश गराडे यांनी दिली.
सध्या उन्हाळा असून उन्हाची तीव्रता वाढल्याने नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत आटू लागले आहेत. अशात वन्यजीव पाण्याच्या शोधार्थ नागरी वस्तीकडे येतात. त्यातून रस्ते मार्ग ओलांडताना अतिवेगातील वाहनांमुळे अपघात होतात.
अधिक वाचा –
– तृषार्थ वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी शिरोता वनविभागात 30 वॉटर होल, वनविभागाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक
– स्तुत्य उपक्रम..! मुक्या प्राणीपक्षांची तहान भागवण्यासाठी फ्री वॉटर बाऊलचे वितरण