प्रभू श्रीराम जन्मोत्सव अर्थाच श्रीराम नवमीनिमित्त ( Ram Navami 2023 ) आज (गुरुवार, दिनांक 30 मार्च) रोजी मावळ तालुक्यातील ( Maval News ) अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात जन्मोत्सव साजरा करण्यात आला. मावळ तालुक्याचे ठिकाण असलेल्या वडगाव नगरीत देखील भाविकांच्या उपस्थितीत जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
वडगाव शहरातील श्री पोटोबा महाराज देवस्थान यांचे वतीने ग्रामदैवत श्री पोटोबा मंदिर मध्ये रामनवमी निमित्ताने प्रभू श्रीराम जन्म उत्सव साजरा करण्यात आला. सकाळी काकडा आरती आणि भजनी मंडळ सेवेकऱ्यांनी भजन करून याचा आनंद वाढवला. ( Ram Navami 2023 ShriRam Janmootsav Celebrations In Potoba Maharaj Temple At Vadgaon In Maval Taluka )
यावेळी देवस्थान चे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, विश्वस्त सचिव अनंता कुडे, विश्वस्त किरण भिलारे, अरुण चव्हाण, तुकाराम ढोरे, सुभाषराव जाधव तसेच काकडा आरती मंडळाचे अध्यक्ष बबनराव भिलारे, उपाध्यक्ष मधुकर पानसरे, मृदूंगमणी हरियाली पानसरे, सोपानराव म्हाळसकर, ज्ञानेश्वर म्हाळसकर, देवस्थान चे मा विश्वस्त अरविंद पिंगळे, नारायण ढोरे बाळकृष्ण ढोरे, मनोजभाऊ ढोरे, रामचंद्र चव्हाण, संतोष पिंपळे, पुजारी शरद गुरव आदींसह ग्रामस्थ भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक वाचा –
– राम जन्मला गं सखे..! मावळ तालुक्यातील प्रभाचीवाडी येथील प्रसिद्ध श्रीराम मंदिरात जन्मोत्सव सोहळा थाटामाटात साजरा । Ram Navami 2023
– ‘सोमाटणे फाटा टोलनाक्यावर टोल फीमध्ये कुठलीही दरवाढ करू नका’, खासदार बारणेंचे आयआरबीला पत्र