लोणावळा शहर जवळील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या लायन्स पॉइंट इथे 600 फूट खोल दरीत कोसळून एका आदिवासी मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. सदर मुलगा हा जांभूळपाडा येथील होता असे समजते. ( Tribal Boy Died After Falling Into 600 Feet Deep Gorge At Lions Point In Lonavala )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
गुरुवारी (30 मार्च) रोजी हा मुलगा सुमारे 600 ते 700 फुट खोल दरीत कोसळला. याची माहिती मिळताच आज सकाळीच बचाव यंत्रणा तिथे पोहोचल्या होत्या. त्यानंतर आज (31 मार्च) सायंकाळच्या सुमारास त्याचा मृतदेह वर काढण्यात यंत्रणांना यश आले. शिवदुर्ग मित्र मंडळ लोणावळा, लोणावळा ग्रामीण पोलिस दल यावेळी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– कॉन्ट्रॅक्टचा आपसी वाद टोकाला, कंपनीच्या बांधकाम साईटवर जात मारहाण, तळेगाव एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल
– पती कामानिमित्त गुजरातला अन् पत्नी मुलांसह माहेरी, चोरट्याने ‘हीच ती वेळ’ म्हणत घर केले साफ, उर्से गावातील घटना