घरी कुणीही नाही हे पाहून अज्ञात चोरट्याने घरफोडी करत लाखोंचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना शिरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत उर्से गावात घडली आहे. याप्रकरणी महिला फिर्यादी यांनी शिरगाव पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार शिरगाव पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय दंड विधान कलम ३८०, ४५४, ४५७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक 27 मार्च 2023 रोजी रात्री 8 ते दिनांक 29 मार्च 2023 रोजी दुपारी अडीचच्या दरम्यान फिर्यादी महिला यांचे राहते घरे (उर्से, ता. मावळ, जि. पुणे) इथे हा प्रकार घडला. ( Burglary In Urse Village Of Maval Taluka Case Registered Against An Unknown Thief In Shirgaon Police )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला यांचे पती गुजरात इथे कामानिमित्त गेल्याने फिर्यादी महिला त्यांच्या मुलांसह माहेरी गेल्या होत्या. तेव्हा महिलेच्या ननंद यांनी फिर्यादीस फोन करुन, तुझ्या घराचे दार उघडे आहे असे सांगितले. त्यानंतर फिर्यादी महिला तत्काळ घरी आल्या आणि त्यांनी पाहिले असता त्यांच्या उर्से गावातील (ता. मावळ, जि. पुणे) राहत्या घराचे सेफ्टी डोअरचे कुलूप कशाच्यातरी सहाय्याने कुणी अज्ञात चोरट्याने तोडल्याचे दिसले. तसेच दरवाजा उघडा होता आणि घराचे बेडरूमध्ये ठेवलेले 34 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकुण 2,32,300 रुपयांचा मुद्देमाल कुणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केला होता, असे फिर्यादीत नमुद आहे. पोलिस उपनिरिक्षक येडे हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
अधिक वाचा –
– कॉन्ट्रॅक्टचा आपसी वाद टोकाला, कंपनीच्या बांधकाम साईटवर जात मारहाण, तळेगाव एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल
– तळेगावात कोयता गँगची दहशत; ‘मोबाईलचे हप्ते भरणार नाही, काय करायचे ते कर’ म्हणत एकावर जीवघेणा हल्ला, 3 आरोपी अटकेत