मोबाईलचे हफ्ते भरत नसल्याची विचारणा केल्याचा राग आल्याने तीन तरुणांनी एकावर धारदार शस्त्राने वार करत खुनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना तळेगाव दाभाडे शहरात घडली आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
फिर्यादी विशाल नंदकिशोर खंदारे (वय २४ वर्षे, व्या. चालक, रा. भाडेतत्वावर दत्त सेवा सोसायटी, फ्लॅट नं. ९, शिवाजी चौक, तळेगाव दाभाडे ता मावळ जि पुणे) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात तीन आरोपींवर भादवि कलम ३०७, ३२३, ५०४, ५०६, ३४, आर्म अॅक्ट क ४ (२५), महा पोलीस अधिक. ३७ (१) (३) सह १३५ व क्रिमीनल अँ. क.७ अन्वये गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. दिनांक २८ मार्च २०२३ रोजी रात्री साडे सात वाजता व दिनांक २९ मार्च २०२३ रोजी रात्री १ च्या सुमारास राहत्या घराजवळ आणि यशवंत नगर गार्डनजवळ (तळेगाव दाभाडे, ता. मावळ जि. पुणे) इथे हा प्रकार घडला. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरुन दिमांक २९ मार्च २०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. ( Talegaon Dabhade Police Arrested Three Accused Who Fatally Attacked One Person With Knife In Hand And Created Terror )
तसेच, सदर प्रकरणातील आरोपी;
१) मयुर अंकुश मते (वय ३१ वर्षे रा. भिमाशंकर कॉलनी, वराळे पुणे)
२) स्वप्नील उर्फ मोन्या आनंद जाधव (रा. वराळे फाटा, ता मावळ पुणे)
३) गणेश उर्फ सौरभ आनंद जाधव (वय २२ वर्षे)
या तीनही आरोपी तरुणांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; नमुद तारिख, वेळी आणि ठिकाणी फिर्यादी विशाल खंदारे यांच्या नावावर आरोपी क्रमांक १ मयूर मते याने मोबाईल विकत घेतला होता. मयूर मते मोबाईलचे हप्ते भरत नसल्याने फिर्यादीनी आरोपीला मोबाइलचे हप्ते का भरत नाही? अशी विचारणा केली. तेव्हा त्याचा त्याला राग आल्याने आरोपी मयूर मते आणि आरोपी क्रमांक २ स्वप्नील जाधव व आरोपी क्रमांक ३ गणेश जाधव हे दुचाकीवरून येऊन; मी हप्ते भरणार नाही जा तुला काय करायचे ते कर अशी धमकी देऊन त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ केली. तसेच आरोपी क्र १ याने त्याच्या हातातील लोखंडी कोयत्याने फिर्यादी याना जीवे ठार मारण्याच्या उदेशाने फिर्यादीच्या डोक्यात वार केल्याने फिर्यादी जखमी होऊन खाली पडले;
त्यानंतर आरोपी क्रमांक १ याचे हातातील कोयता आरोपी क्रमांक ३ याने घेवुन उलट्या बाजुने व सरळ बाजुने तिन ते चार वेळा जिवे ठार मारण्याच्या उदेशाने डोक्यावर व अंगावर हातावर वार केले. त्यानंतर आरोपी क्रमांक २ याने लाथाबुक्यांनी फिर्यादी मारहान केली. स्टेशन रोड वरून जाणारे येणारे प्रवाशी हे भांडण पाहुन भयभीत होऊन सैरावैरा पळत होते. तसेच हातातील कोयता फिरवत सार्वजनिक ठिकाणी आरोपींनी दहशत निर्माण केली, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलिस सब ईन्सपेक्टर मुल्ला हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे आणि कामशेत भागातून मोक्कातील 7 अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश
– ‘सोमाटणे फाटा टोलनाक्यावर टोल फीमध्ये कुठलीही दरवाढ करू नका’, खासदार बारणेंचे आयआरबीला पत्र