व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कॉन्ट्रॅक्टचा आपसी वाद टोकाला, कंपनीच्या बांधकाम साईटवर जात मारहाण, तळेगाव एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल

कॉन्ट्रॅक्टच्या आपसी वादातून एका कंपनीच्या बांधकाम साईटवर जात तेथील क्रेन सर्विस देणाऱ्या व्यावसायिकाला आणि कामगारांना लाकडी दांडक्याने मारहाण करत धक्काबुक्की केल्याची गंभीर घटना तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दी घडली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 31, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
Talegaon-MIDC-Police-Station

File Image - Talegaon MIDC Police Station


कॉन्ट्रॅक्टच्या आपसी वादातून एका कंपनीच्या बांधकाम साईटवर जात तेथील क्रेन सर्विस देणाऱ्या व्यावसायिकाला आणि कामगारांना लाकडी दांडक्याने मारहाण करत धक्काबुक्की केल्याची गंभीर घटना तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दी घडली आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

याप्रकरणी फिर्यादी अनिल मारुती नरवडे (वय ४० वर्षे, धंदा क्रेन सर्विव्हीस, रा. नवलाख उंबरे ता मावळ जि पुणे) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात भारतीय दंड विधान कलम ३४१, ३३७, १४३, १४४, १४८, १४९, ३२३, ५०४ महाराष्ट्र पालीस अधिनियम ३७१,१३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक २९ मार्च २०२३ रोजी दुपारी दोनच्या सुमारास मौजे मिंडेवाडी, नवलाख उंब्रे ता मावळ जि पुणे इथे बोनफिगलोली बिटी पी.एल. या कंपनीच्या बांधकाम साईटवर हा प्रकार घडला. ( Beating At Companys Construction Site Over Contract Dispute Case Registered In Talegaon MIDC Police )

तक्रारीनुसार,
१) बळीराम मराठे (रा. मिंडेवाडीता मावळ जि पुणे)
२) हेमंत शेळके (रा. तळेगाव ता मावळ जि पुणे)
३) शाम शेळके (रा. तळेगाव ता मावळ जि पुणे)
४ विजय लांडे (रा. तळेगाव ता मावळ जि पुणेः
आणि इतर ३ ते ४ लोक (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीत नमुद केलेल्या तारखेला, वेळी आणि ठिकाणी आरोपी यांनी बेकायदेशीर जमाव जमवून कंपनीमधील क्रेनच्या कॉन्ट्रक्टच्या आपसातील वादावरून फिर्यादी आणि त्याच्या कामगारांना काम करण्यापासून रोखले. तसेच शिवीगाळ दमदाटी करून हातात लाकडी दांडके आणि दगड घेऊन फिर्यादी व साक्षीदारांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच दगड फेकून मारून धक्का बुक्की केली, असे फिर्यादीत नमुद आहे. या प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसून पोलिस उप निरीक्षक वालकोळी हे या प्रकरणाचा अधिकचा तपास करत आहे.

अधिक वाचा –
– तळेगावात कोयता गँगची दहशत; ‘मोबाईलचे हप्ते भरणार नाही, काय करायचे ते कर’ म्हणत एकावर जीवघेणा हल्ला, 3 आरोपी अटकेत
– तळेगाव दाभाडे आणि कामशेत भागातून मोक्कातील 7 अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश


dainik maval jahirat

Previous Post

अरे यांना आवरा…! मुंबईत रेल्वे स्टेशनवर खुलेआम किस करणाऱ्या जोडप्याचा व्हिडिओ व्हायरल, सोशलवर टीकेची झोड

Next Post

पती कामानिमित्त गुजरातला अन् पत्नी मुलांसह माहेरी, चोरट्याने ‘हीच ती वेळ’ म्हणत घर केले साफ, उर्से गावातील घटना

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Thievish

पती कामानिमित्त गुजरातला अन् पत्नी मुलांसह माहेरी, चोरट्याने 'हीच ती वेळ' म्हणत घर केले साफ, उर्से गावातील घटना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala residents public outcry against Tata highway blocked demanding compensation for flood damages

टाटा कंपनीविरोधात लोणावळाकरांचा जनआक्रोश, महामार्ग रोखला ; पुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी आंदोलन

July 29, 2026
Laptops distributed to Assistant Agriculture Officers by Deputy Chief Minister Sunetra Pawar

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांना लॅपटॉपचे वाटप; मावळमधील ४५ अधिकाऱ्यांना लॅपटॉप

July 29, 2026
Car overturns into field after road collapses at Kale-Pavananagar no remedial measures taken after accident

काले-पवनानगर येथे रस्ता खचल्याने कार शेतात उलटली, सुदैवाने जिवितहानी टळली; अपघाताच्या चार दिवसांनंतरही उपाययोजना शून्य

July 28, 2026
Rice-Cultivated-Maval

Rice Farming in Maval Taluka : ‘गेले ते दिवस, राहिल्या फक्त आठवणी’ … मावळ तालुक्यात भातशेतीचं स्वरुप प्रचंड बदललं

July 28, 2026
SRT

SRT Rice Technique : ‘एसआरटी’ म्हणजे नक्की काय रे भाऊ ? भात लागवडीची ही पद्धत का होतेय शेतकऱ्यांच्या पसंतीची, जाणून घ्या

July 28, 2026
Momentum for Nigdi-Chakan Metro Line Project Plan Presented mp shrirang barne mla sunil shelke

किवळे- रावेत- डांगे चौक- काळेवाडी- जगताप डेअरी ते चतु:श्रृंगी मेट्रो मार्गाचा ‘डीपीआर’ तयार करण्याची सूचना

July 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.