लोणावळा शहराजवळील कुरवंडे (ता. मावळ) याठिकाणी एका खासगी बंगल्यात कर्नकर्कश आवाजात डीजे लावून सोबत आणलेल्या बारबालांसह अश्लील हावभाव करत नाचणाऱ्या दहा जणांवर लोणावळा पोलिसांनी कारवाई केली आहे. लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये बंगला मालक, बंगला चालक व केअर टेकर यांनादेखील आरोपी करण्यात आले आहे. शनिवारी(दिनांक 1 एप्रिल) मध्यरात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. ( Lonavla police led by IPS Sathyasai Karthik raided a bungalow in Kurwande where obscene dance was going on )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांना गोपनीय बातमीद्वारामार्फत बातमी मिळाली की, मौजे कुरवंडे ता. मावळ जि. पुणे गावाच्या हद्दीत शर्मा व्हिला या खाजगी बंगल्यात बरेच लोक सार्वजनिक शांततेचा भंग होईल, असे साऊंड सिस्टीम लावुन मोठमोठ्याने गाणी वाजवत अश्लिल हावभाव करीत बारबालांना नाच करायला लावत आहेत. सदर बातमी मिळाल्याने आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी आपल्या पोलीस स्टाफ यांच्या मदतीने सदर ठिकाणी छापा टाकला.
त्यावेळी सदर ठिकाणी शिवाजी रामचंद्र भोसले (वय 50 वर्षे, रा. पंढरपुर रोड, ता. सांगोला, जि. सोलापुर), अभिजीत मच्छिंद्र सोनलकर (वय 37 वर्षे, रा. वंदे मातरम चौक, सांगोला, जि. सोलापुर), धनाजी अर्जुन जगताप (वय 37 वर्षे, रा. कडलस नाका, ता. सांगोला, जि.सोलापुर), संतोष नामदेव शिंदे (वय 48 वर्षे, रा बलवडी, ता सांगोला, जि सोलापुर), प्रविण चंद्रमोहन पैलवान (वय 48 वर्षे, रा.वझराबाद पेठ, सांगोला, जि सोलापुर) आणि फिरोज जहांगीर तांबोळी (वय 45 वर्षे, रा. भवानी चौक, सांगोला, जि सोलापुर) या सहा जणांसह 4 महिला अश्लिल हावभाव करीत नाचत असल्याचे मिळून आल्या.
हेही वाचा – मावळ तालुका हादरला..! शिरगाव गावचे राष्ट्रवादीचे विद्यमान सरपंच प्रविण गोपाळे यांची भरचौकात हत्या
पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर लोणावळा शहर पोलीस स्टेशन विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच वरील गुन्ह्यास सहाय्य करणारे बंगाला मालक श्रेयश शर्मा (रा. मुंबई) सदरचा बंगला भाड्याने घेऊन चालविणारे लक्ष्मण दाभाडे (रा. लोणावळा), बंगल्याचा केअर टेकर कैलास पवार (रा. खंडाळा, लोणावळा) आणि गुरु पाटील (रा. तुंगार्ली, लोणावळा) यांनाही आरोपी करण्यात आले आहे.
ही कामगीरी पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक आणि त्यांच्या पथकातील पो.हवा. अंकुश नायकुडे, जयराज पाटणकर, म.पो.हवा. आशा कवठेकर, चा.पो.शि. अंकुश पवार, पो.शि. सुभाष शिंदे, मनोज मोरे यांनी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पो. नि. सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा. जयराज पाटणकर हे करीत आहेत.
अधिक वाचा –
– अपघात ब्रेकिंग : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर पहाटेच्या अंधारात अपघात, ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि…
– बेबडओहोळ गावात घरोघरी येणार जलगंगा; तब्बल 4 कोटी 91 लाखाच्या नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमीपूजन