मावळ तालुक्यातील पवन मावळ भागातील येळसे गावातील श्री भैरवनाथ महाराज देवाच्या वार्षिक उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 7 एप्रिल 2023 पासून येळसे येथील श्री भैरवनाथ देवाचा अंखड हरिनाम सप्ताह सुरु होत आहे.
तसेच देवाच्या वार्षिक उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात पहाटे 4 ते 6 काकडा आरती, सायंकाळी 5 ते 6 प्रवचन, सायंकाळी 6 ते 7 हरिपाठ, सायंकाळी 7 ते 9 हरिकिर्तन, रात्री 9 ते 10 भोजन, रात्री 10 नंतर हरिजागर अशी कार्यक्रमाची रुपरेषा आहे. ( Maval Taluka Yelase Village Akhand Harinam saptah on occasion of annual festival of village deity Shri Bhairavanath Maharaj )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
प्रवचनकार
हभप गोपीचंद महाराज कचरे (आंळदी देवाची)
ह.भ.प. घनश्याम महाराज पडवळ (कुरवंडे)
हभप शंकर महाराज आडकर (शिवली)
किर्तनकार
ह.भ.प. गणेश महाराज गोणते (चावसर)
ह.भ.प. धर्मराज महाराज हांडे (शिवशंभूचरित्र व्याख्याते मुळशी)
ह.भ.प. आसाराम महाराज बडे (आंळदी देवाची)
तर काल्याचे किर्तन दिनांक 10 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10 ते 12 ह.भ.प. वैभव महाराज राक्षे (आचार्य गाथा, देहु) यांची किर्तन सेवा होईल. या संपूर्ण वार्षिक उत्सव कार्यक्रमाचे आयोजन समस्थ ग्रामस्थ येळसे यांनी केले असल्याचे उत्सव कमिटी येळसे यांनी सांगितले.
अधिक वाचा –
– व्हिडिओ : बळीराजामुळे वाचले कासवाचे प्राण, वन्यजीव रक्षक मावळच्या प्राणीमित्राची तत्काळ मदत । तळेगाव दाभाडे
– वडगाव नगरीचे ग्रामदैवत पोटोबा महाराज उत्सवानिमित्त कार्यक्रमांची रेलचेल; मानाचे बगाड ते कुस्त्यांचा आखाडा, वाचा सविस्तर