मावळ तालुक्यातील जुन्या मुंबई पुणे हायवेवर मंगळवार (दिनांक 4 एप्रिल) रोडी रात्री साडेबाराच्या दरम्यान अपघात झाला असून यात एक अनोळखी महिला ठार झाल्याची माहिती कामशेत पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; नायगाव (ता. मावळ जि. पुणे) गावच्या हद्दीत मंगळवारी (दिनांक 04/04/2023) रोजी रात्री साडेबारा सुमारास जुना पुणे मुंबई हायवे रोड एचपी पेट्रोल पंपा समोर एका अज्ञात स्त्रीचा (वय अंदाजे 45 ते 50 वर्ष) हिचा अपघात झाला.या अपघातात सदर महिला गंभीर जखमी होऊन मृत पावली आहे. तसेच अपघातात तिच्या शरीराचा अक्षरशः चेंदामेंदा झाला असून ओळख पटवता येत नाही. ( Unidentified Woman Killed In An Accident In Front Of HP Petrol Pump On Old Mumbai Pune Highway In Naigaon Area Maval Taluka Information By Kamshet Police )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मृत महिलेचे वर्णन – महिलेच्या उजव्या हातावर मराठीमध्ये निका असे लिहिलेले आहे. तिच्या अंगावर एक काळा बुरखा व जॅकेट आहे.
तरी, सदर मृत महिलेचे कुणी नातेवाईक असल्यास किंवा तिची ओळख असल्यास किंवा तिच्या हातावरील नीका गोंदलेले चिन्ह कोणी ओळखत असेल, तर कामशेत पोलीस स्टेशन इथे संपर्क साधावा, असे आवाहन कामशेत पोलिसांनी केले आहे.
कामशेत पोलीस स्टेशन नंबर – 02114/262440
सहा फोजदार अब्दुल शेख – मो.नं. 9923312828
अधिक वाचा –
– मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर बोरज गावाच्या हद्दीत कार आणि ट्रकचा भीषण अपघात, 2 जण ठार । Accident News
– येळसे गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवाच्या उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह, पाहा संपूर्ण कीर्तन सप्ताहाचे नियोजन