श्री बाळूमामा उत्सवानिमित्त मावळ तालुक्यातील दुर्गम भागातील महिलांसाठी भाजपा महिला आघाडी मावळ तालुका आणि महिला आघाडी अध्यक्षा सायली बोत्रे यांच्याकडून ‘खेळ रंगला पैठणीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दुर्गम भागात पहिल्यांदाच झालेल्या अशा कार्यक्रमाचा आनंद महिलांच्या चेहऱ्यावर दिसत होता. ( on occasion of Shree Balumama Utsav Khel Rangala Paithanicha organized by BJP Womens Aghadi Sayali Botre in Maval taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमात मानाच्या पैठणीच्या मानकरी यशिका चौधरी या ठरल्या. तर द्वितीय क्रमांक जानकी येवले यांनी आणि तृतीय क्रमांक किर्ती मोंगाळ, चतुर्थ क्रमांक सोनाली मरगळे, पंचम क्रमांक सुनिता होले, सहावा क्रमांक वैशाली हिरवे, सातवा क्रमांक सिता ठोंबरे यांनी पटकावला. तसेच यावेळी प्रत्येक सहभागी महिलेला अरविंद बालगुडे आणि सायली बोत्रे यांच्या वतीने साडी भेट देण्यात आली.
‘दुर्गम भागातील माझ्या मैत्रिणींच्या आनंदासाठी खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम घेण्यात आला. माझ्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर अविस्मरणीय कार्यक्रम या ठिकाणी पार पडला. माझ्या प्रत्येक मैत्रिणीच्या चेहऱ्यावरील आनंद हेच या कार्यक्रमाचे यश होते,’ असे सायली बोत्रे यांनी भावना व्यक्त करताना सांगितले.
सदर कार्यक्रमाला लोणावळा शहराच्या माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव, भाजपा प्रदेश सचिव जितेंद्र बोत्रे, ग्रामपंचायत सदस्य अरविंद बालगुडे मीना शिंदे, सिमा ठोंबरे, राजु हिरवे, राजु जानकर, लक्ष्मण मरगळे, रमेश खरात, लहु तिडके, दहिवली पोलीस पाटील सागर येवले, वाकसई गण अध्यक्ष सचिन येवले, प्रसाद हुलावळे, सदाशिव बांगर, अनिल गायकवाड, आशिष बुटाला, सुजाता मेहता, रावळभाभी, सांगीसे उपसरपंच चंदा पिंगळे, भाजप महिला कार्याध्यक्ष सुमित्रा जाधव, संघटन सरचिटणीस कल्याणी ठाकर, नाणे मावळ महिला अध्यक्ष सीमा आहेर, भाजपा महिला उपाध्यक्ष रोहिणी गाडे, अश्विनी तिकोणे, अंजली कडू, सुप्रिया शेलार, सुजाता शेलार, मनीषा चौधरी यांसह महिलाभगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
अधिक वाचा –
– टाटा डॅममध्ये बुडालेल्या ‘त्या’ तरुणाचा शोध घेण्यात पहिल्या दिवशी अपयश, शुक्रवारी पुन्हा होणार ‘सर्च ऑपरेशन’
– ‘ज्या वाडी-वस्तीवर अद्याप वीज नाही तिथे वीज पोहचवा’, महावितरणच्या अधिकाऱ्यांना आमदार शेळकेंच्या सुचना, वाचा