मावळ तालुक्यातील ( Maval News ) वीज वितरण संबंधित असलेल्या विविध कामांचा आढावा घेण्यासाठी आमदार सुनिल शेळके ( Sunil Shelke ) यांची महावितरणच्या अधिकाऱ्यांसमवेत आज (गुरुवार, दिनांक 6 एप्रिल) रोजी शासकीय विश्रामगृह वडगाव मावळ इथे विशेष आढावा बैठक संपन्न झाली. ( Review Meeting Held By Maval MLA Sunil Shelke With Mahavitaran MSEDCL Officer At Vadgaon )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
आमदार सुनिल शेळके यांनी केलेल्या सुचना;
- डीपीसी अंतर्गत मंजूर असलेल्या कामांना तात्काळ सुरुवात करण्यात यावी.
- तालुक्यातील अनेक गावांमध्ये कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत आहेत. याची दखल घेऊन वीज पुरवठा सुरळीत करावा.
- कमी क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर, जळालेले डिस्ट्रीब्यूशन बॉक्स, जीर्ण विद्युत खांब, विद्युत तारा बदलाव्यात.
- सामान्य नागरिकांना महावितरणशी संबंधित असलेल्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही, याची काळजी घ्यावी.
- तालुक्यातील आदिवासी, कातकरी वस्तीवर काही ठिकाणी आजही वीज पोहचलेली नाही. अशा ठिकाणी वीज पोहचविण्यासाठी प्रयत्न करावेत.
- अखंडित वीजपुरवठा होण्यासाठी देखभाल-दुरुस्तीची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत
अशा सूचना आमदार सुनिल शेळके यांनी अधिकाऱ्यांना बैठकीत दिल्या आहेत.
वीज वितरण संबंधित असलेल्या विविध कामांचा आढावा घेण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांसमवेत शासकीय विश्रामगृह वडगाव मावळ येथे आज बैठक संपन्न झाली.अखंडित वीजपुरवठा होण्यासाठी देखभाल-दुरुस्तीची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत,अशा सूचना अधिकाऱ्यांना बैठकीत दिल्या आहेत. pic.twitter.com/f5BTEsEYuI
— Sunil Shelke (@shelkesunilanna) April 6, 2023
यावेळी आमदार शेळके, महावितरण कार्यकारी अभियंता संदीप दरवडे, उपकार्यकारी अभियंता संदीप दारमवार, विष्णू पवार, विवेक सूर्यवंशी, राजेंद्र गोरे, शाखा अभियंता आदी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– पुणे जिल्ह्यात 60 हजार एकर पोटखराब क्षेत्र लागवडीखाली, राज्यात अव्वल कामगिरी; मावळ तालुका जिल्ह्यात दुसऱ्या स्थानी
– अपघात ब्रेकिंग! जुना मुंबई पुणे हायवेवर नायगाव हद्दीतील पेट्रोल पंपासमोर अपघात, अनोळखी महिला ठार