वडगाव मावळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत मौजे वडेश्वर शिंदेवाडी येथील महादेव मंदिरासमोरील ठोकळवाडी (टाटा डॅम) धरणाच्या पाण्यात दिनांक 05 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास अर्जुन सुभाष माने (वय 25 वर्ष, रा कोल्हापूर) आणि अक्षय कुंभार (रा कळंब जि धाराशिव) हे दोघे पोहण्यासाठी उतरले होते. ( Youth Dies After Drowning In Tata Dam Andar Maval Search Operation Underway )
त्यांचे बाकीचे मित्र 1) मितेश विजय राठोड 2) नयन सिद्धार्थ जाधव 3) ओम शेखर मराठे 4) सुरज शिवाजी जगताप 5) सुशांत सुधाकर धर्माधिकारी हे पाण्याचे किनाऱ्यावर उभे होते. दरम्यान पोहायला गेलेल्या दोघांपैकी एक अर्जुन माने हा पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह शोधण्यासाठी गुरुवारी, 6 एप्रिल रोजी अथक प्रयत्न करण्यात आले, मात्र त्यात यश आले नाही.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
गुरुवारी सकाळी 09.00 वाजता लोणावळा येथील शिवदुर्ग रेस्क्यू टीम, वन्यजीव रक्षक मावळ संस्था मदती करिता गेले होते. यंत्रणांनी दिवसभर भरपुर प्रयत्न केले, पण अर्जून माने याचा मृतदेह काही अद्याप सापडलेला नाही. त्यामुळे आज (शुक्रवार, 7 एप्रिल) रोजी पुन्हा शोधकार्य केले जाणार.
या ठिकाणी यापूर्वीही अशा अपघाती घटना घडल्या आहेत. तरी सदर घटनेत कोणता घातपात नसल्याबाबत अधिक तपास करुन खातरजमा करण्यासाठी सुचना दिल्या आहेत. तसेच संबंधित तरुणाचा मृतदेह मिळाल्यानंतर पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
गुरुवारी सर्च ऑपरेशनमध्ये सहभागी आपदा मित्र, शिवदुर्ग मित्र लोनावळा, वन्यजीव रक्षक मावळ संस्था यांचे सहकारी;
महेश मसने, सागर कुंभार, अनिल आंद्रे, अजय शेलार, दिगंबर पडवळ, सुनिल गायकवाड, योगेश दळवी, अमित बलकवडे, मयुर दळवी, अमोल सुतार, निलेश गराडे, भास्कर माळी मामा इ.
अधिक वाचा –
– ‘ज्या वाडी-वस्तीवर अद्याप वीज नाही तिथे वीज पोहचवा’, महावितरणच्या अधिकाऱ्यांना आमदार शेळकेंच्या सुचना, वाचा
– ब्रेकिंग! मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर उर्से टोलनाक्याजवळ भीषण कार अपघात, 4 जण जागीच ठार