वाचन वेड संस्था, पुणे यांच्या विशेष सहकार्यातून आणि अभंग प्रतिष्ठान श्री क्षेत्र देहू यांच्या माध्यमातून थोर समाज सुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मावळ तालुक्यातील इंदोरी, नवलाख उंबरे आणि बेबडओहोळ केंद्रातील एकूण 40 जिल्हा परिषद शाळांना प्रेरणादायी अवांतर वाचनाची पुस्तके वाटप करण्यात आली. ( Distribution Of Books To 40 Schools In Maval Taluka Through Vachan Ved Sanstha and Abhang Pratishthan Dehu )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सदर कार्यक्रमाला मावळ तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी सुदाम वाळुंज, तळेगाव बीट चे विस्तार अधिकारी श्रीकृष्णा भांगरे, केंद्रप्रमुख मिनीनाथ खुरसुले, बाळासाहेब जाधव आणि पोपटराव चौगुले तसेच वसंत भसे (उपाध्यक्ष अभंग प्रतिष्ठान) सचिन लिंभोरे (सचिव अभंग प्रतिष्ठान) निलेश बाठे (अध्यक्ष ज्ञानगंगा सोशल फाउंडेशन) सुरेश गाडे (उद्योजक) सचिन कुंभार (मा. उपसरपंच देहू) विजय मोरे (माजी अध्यक्ष अभंग प्रतिष्ठान) प्राध्यापक विक्रम भोईटे, शेखर अडसुळे, अजिंक्य साकोरे, प्रा विकास कंद, शाळेचे संस्थापक व चेअरमन भगवान शेवकर, प्राचार्य जेसी रॉय तसेच तीनही केंद्रातील 40 शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.
वाचन वेड संस्थेमार्फत जिल्हा परिषद 40 शाळांना अवांतर वाचनाची पुस्तके वाटप करण्यात आली. या प्रसंगी प्रा. विकास कंद सरांनी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याविषयी अनमोल मार्गदर्शन केले.
पुस्तकांचे जीवनातील महत्त्व याविषयी मनोगत व्यक्त केले. माननीय गटशिक्षण अधिकारी सुदाम वाळुंज यांनी पुस्तकांचे अवांतर वाचन केल्यामुळे ज्ञानात भर पडते व यामुळे जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. एक चांगले पुस्तक माणसाच्या आयुष्याची दशा आणि दिशा बदलून टाकते, असे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विषय साधन व्यक्ती श्रीमती सुचिता भोई व आभार प्रदर्शन श्रीमती आरती कुंडले विषय साधन व्यक्ती पंचायत समिती मावळ यांनी केले. ( Distribution Of Books To 40 Schools In Maval Taluka Through Vachan Ved Sanstha and Abhang Pratishthan Dehu )
अधिक वाचा –
– मावळ तहसील कार्यालयात महात्मा जोतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी
– पोहण्याचा मोह जीवावर बेतला! कामशेतजवळ इंद्रायणी नदीत बुडून दापोडीतील तरुणाचा मृत्यू