कामशेत जवळ इंद्रायणी नदी पात्रात पोहण्याचा मोह एका तरुणाच्या जिवावर बेतला आहे. इंद्रायणीच्या डोहात पोहायला उतरलेल्या तरुणाचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. हर्ष लक्ष्मण अडसूळे (वय 17, रा. दापोडी, पुणे) असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. ( youth from Dapodi dies after drowning in Indrayani river near Kamshet maval )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी (दिनांक 11 एप्रिल) रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. दापोडी येथील मित्रांचा पाच जणांचा ग्रुप फिरण्यासाठी या भागात आलेला होता, तेव्हा ते सर्वजण इंद्रायणी पात्रात पोहण्यासाठी उतरले. त्यापैकी हर्ष अडसूळे याचा बुडून मृत्यू झाला.
सदर अपघाताची माहिती मिळताच कामशेत पोलिस स्टेशनचे कर्मचारी आणि वन्यजीव मावळ रक्षक संस्था, शिवदुर्ग मित्र लोणावळा आणि आपदा मित्र मावळ हे घटना स्थळी पोहोचले. पाण्यात बराच वेळ शोधाशोध केल्यानंतर बुडालेल्या तरुणाचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यास यंत्रणांना यश आले.
कामशेत पोलिसचे सहाय्यक फौजदार अब्दुल शेख हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. शिवदुर्ग मित्र लोणावळा, वन्यजीव रक्षक मावळ संस्था, आपदा मित्र मावळ टीमचे निलेश गराडे, अनिल आंद्रे, दिगंबर पडवळ, राहुल दुर्गे, अमित बलकवडे, योगेश दळवी, विशाल जव्हेरी यांनी सर्च ऑपरेशनमध्ये सहभाग घेतला.
अधिक वाचा –
– टाटा डॅममध्ये बुडालेल्या ‘त्या’ तरुणाचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात अखेर यंत्रणांना यश
– तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशनसमोर ऑटो रिक्षा आणि कंटेनरचा अपघात; शहर भागात एकाच दिवशी तिसरा अपघात