मावळ तालुक्यातील कान्हे फाट्यापासून आतमधील बाजूस वडेश्वर मंदिराजवळ असलेल्या प्रफुल त्रिभुवन यांच्या फार्म हाऊसमध्ये शेफ म्हणून काम करणारा अर्जुन सुभाष माने (वय 25, मूळ राहणार कोल्हापूर) हा तरुण आपल्या मित्रांसह फार्म शेजारी असलेल्या धरणाच्या पात्रामध्ये पोहत होता. तेव्हा दमछाक झाल्याने धरणात बुडाल्याची माहिती (दिनांक 5 एप्रिल) त्याच्या मित्रांनी स्थानिकांना आणि तद्नंतर पोलीस प्रशासनाला दिली होती. सलग चार दिवस त्याचा शोध घेतल्यानंतर अखेरीस पाचव्या दिवशी (दिनांक 9 एप्रिल) त्याचे शव पाण्याबाहेर काढण्यास यंत्रणांना यश आले आहे. ( bodies of the youth who drowned in tata dam were successfully recovered from the water vadgaon maval police station )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
आपदा मित्र मावळ, शिवदुर्ग मित्र मंडळ – लोणावळा, मावळ तालुक्यातील वन्यजीव रक्षक मावळ संस्था आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था यांसह स्थानिक गावकऱ्यांनी देखील चार दिवस त्याच्या शोधासाठी प्रयत्न केले होते. परंतू, खोल पाणी आणि अवकाळी पाऊस यामुळे अनेकदा शोधकार्यात अडथळे आले. अखेरीस अर्जून माने बुडालेच्या पाचव्या दिवशी म्हणजेच रविवार, दिनांक 9 एप्रिल रोजी सकाळी त्याचे शव पाण्याच्या वर आलेले दिसले. त्यानंतर यंत्रणांनी तत्काळ त्याचे शव पाण्याबाहेर काढले.
“टाटा डॅम या ठिकाणी या आधी देखील अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. येणाऱ्या पर्यटकांनी सावधगिरी बाळगावी. तसेच हे धरण खूप जुने असल्याने याचा अंदाज येत नाही, त्यामुळे सावधगिरी बाळगावी,” असे आवाहन वडगाव मावळ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी केले आहे.
हेही वाचा – अवकाळीचा कहर..! गारपीट अन् वादळी वाऱ्यामुळे आंदर मावळ भागातील बागायतदार, फुलउत्पादक शेतकरी संकटात
सतत पाच दिवसापासून शोध घेणारे वडगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाऱ्यांसमवेत आपदा मित्र मावळ, शिवदुर्ग मित्र लोनावळा रेस्क्यू टीम, वन्यजीव रक्षक मावळ संस्था रेस्कू टीमचे राजेंद्र कडु, सुनिल गायकवाड, निलेश गराडे, अनिल आंद्रे, गणेश निसाळ, महेश मसने, सागर कुंभार, अजय शेलार, दिगंबर पडवळ, योगेश दळवी, अमित बलकवडे, मयुर दळवी, अमोल सुतार, भास्कर माळी, शुभम काकडे, सचिन वाडेकर, दक्ष काटकर, विनय सावंत, अवि कारले विशाल जव्हेरी, प्रशांत शेडे, गणेश ढोरे, विकी दौंडकर, साहील नायर, साहील लांडगे, कमल परदेशी, सत्यम सावंत, अजय मुर्हे, अजित सावंत यांनी सहभाग घेतला होता.
अधिक वाचा –
– पवन मावळ भागाला अवकाळी पावसाने झोडपले, गारपिटीमुळे शेतीमालाचे मोठे नुकसान, पंचनामे त्वरित करण्याची मागणी
– पुणे जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या 24 लाभार्थी शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषि विकास योजनेतून नवीन विहीर