हवामान खात्याच्या पूर्व इशाऱ्यानुसार रविवारी (9 एप्रिल) राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातही अनेक भागात गारांचा पाऊस झाला. शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घालणारा आणि परिसराला अवकळा आणणारा हा अवकाळी पाऊस ठरला. ( Unseasonal Rain Damage To agriculture in Pavan Maval area Pune District )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पवन मावळ भागात पवनानगर पासून आजू बाजूच्या गावात सर्वदूर अवकाळी सरी बरसल्या. यासह पवना धरण पाणलोट क्षेत्रातही जोराचा पाऊस आणि गारपीट झाली. अवकाळी पावसाला सुरुवात होण्यापूर्वी आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या शेडचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.
निसर्गाच्या या रौद्र रुपाने बळीराजासह अनेक सामान्यांवर आर्थिक संकट कोसळले असून शासनाने अधिकाऱ्यांकरवे नुकसान झालेल्या ठिकाणी पंचनामे करून संबंधितांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नागरिक करत आहे.
अधिक वाचा –
– वराळे गावातील नळ पाणीपुरवठा योजनेसह विविध विकास कामांचे भूमीपूजन आणि लोकार्पण, आमदार शेळकेंची उपस्थिती
– पुणे जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या 24 लाभार्थी शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषि विकास योजनेतून नवीन विहीर