महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) हे रविवारी (9 एप्रिल) एक दिवसीय अयोध्या दौऱ्यावर ( Ayodhya Vidit) होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) हे देखील रविवारी सकाळी अयोध्येत पोहोचले. रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अयोध्येत एकत्र आले.
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी लखनौहून अयोध्येला येत असताना हेलिकॉप्टर मधून अयोध्या शहरात साकारत असलेल्या प्रभू श्रीराम यांच्या भव्य मंदिराचे ( Shree Ram Mandir ) बांधकाम कॅमेरात टिपले. या विहंगम दृश्याचा व्हिडिओ फडणवीसांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अयोध्येतील श्रीराम मंदिराचे बांधकाम सध्या जोरात सुरु असून स्थापत्य कलेचा एक अद्भूत नजारा ठरावा, असं बांधकाम होत आहे. हे महाप्रचंड बांधकाम सध्या प्रगतीपथावर असून पुढील वर्षी जानेवारी महिन्यात मंदिर भाविकांसाठी खुले होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र सध्या मंदिराच्या बांधकामाचा नजारा हाही सर्वांना आकर्षित करत आहे. ( bird eye view of ayodhya shree ram temple deputy cm devendra fadnavis share video on twitter )
फडणवीस हे रविवारी एक दिवसाच्या अयोध्या दौऱ्यावर (उत्तर प्रदेश) आले असता त्यांनी या मंदिराचे बांधकाम सुरू असतानाचा एक व्हिडिओ काढलाय. श्रीराम मंदिराचे हे विहंगम दृश्य त्यांनी शेअर केले. “अयोध्येत प्रभू श्री राम मंदिराच्या उभारणीचे काम अशा प्रकारे सुरू आहे. लखनौहून अयोध्येकडे जाताना हेलिकॉप्टरमधून टीपलेले दृश्य. || जय श्री राम ||” असे ट्विट फडणवीस यांनी केले आहे.
This is how Prabhu Shri Ram Mandir construction work is going on in Ayodhya.
Ariel view from chopper on way to Ayodhya from Lucknow.
॥ Jai Shri Ram ॥#jaishriram #rammandir #ayodhya #ayodhyarammandir #uttarpradesh #ramlala #trending pic.twitter.com/LOZV9YkjVp— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) April 9, 2023
फडणवीस अचानक अयोध्येत आणि चर्चांना उधाण…
खरे तर अयोध्या दौरा हा शिवसेनेचा होता. तरीही भाजप नेते या दौऱ्यात सामील झाल्याचे दिसले. खासकरून रविवारी देवेंद्र फडणवीसही अयोध्येला आले, त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. देवेंद्र फडणवीस अचानक अयोध्येला का आले? अशी चर्चा रंगलेली असतानाच खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी, ‘या भूमीशी माझं नातं आहे. या ठिकाणच्या अनेक आठवणी आहेत. रामलल्लाचं दर्शन घेण्याची इच्छा होती म्हणून मी आलोय,’ असं उत्तर माध्यमांना दिले.
This is how Prabhu Shri Ram Mandir construction work is going on in Ayodhya.
Ariel view from chopper on way to Ayodhya from Lucknow.
॥ Jai Shri Ram ॥#jaishriram #rammandir #ayodhya #ayodhyarammandir #uttarpradesh #ramlala #trending pic.twitter.com/LOZV9YkjVp— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 9, 2023
अधिक वाचा –
– पुणे जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या 24 लाभार्थी शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषि विकास योजनेतून नवीन विहीर
– वराळे गावातील नळ पाणीपुरवठा योजनेसह विविध विकास कामांचे भूमीपूजन आणि लोकार्पण, आमदार शेळकेंची उपस्थिती