पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात पाईट पोलिस स्टेशनच्या हद्दीत आडगाव बंधारा / पाझर तलाव इथे एक तरुण बुडाल्याची घटना घडली आहे. सावळा बाळू मधे (वय वर्ष 26, रा. सुपे, ता. खेड, जिल्हा पुणे) हा ठाकर आदिवासी समाजातील तरुण शनिवारी (दिनांक 8 एप्रिल 2023) रोजी दुपारी दीडच्या सुमारास आंघोळीसाठी सदर तलावात उतरला होता. त्यावेळी तो दारुच्या नशेत असल्याने पाण्यात मध्यंतरी गेला असता बुडाला अन् त्यातच त्याचा मृत्यू झाला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
शनिवारी सायंकाळी त्याचा शोध घेऊनही तो सापडला नाही. त्यामुळे रविवारी, 9 एप्रिल रोजी पाईट पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार राठोड आणि नांगरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवदुर्ग टीम, वन्यजीव रक्षक मावळ संस्थेची टीम, आपदा मित्र मावळ यांच्या मदतीने सर्च ऑपरेशन राबवण्यात आले. यावेळी दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर मृतदेह हाती लागला. ( youth drowned at adgaon bandhara pazar talav in limits of pait police station in khed taluka of pune district )
हेही वाचा – टाटा डॅममध्ये बुडालेल्या ‘त्या’ तरुणाचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात अखेर यंत्रणांना यश
स्थानिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला आणि पुढील कार्यवाहीसाठी चाकण ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आला. यावेळी पोलीस पाटील गणेश गोपाळे सरपंच प्रकाश गोपाळे इतर ग्रामस्थ उपस्थित होते. बचाव कार्य करत असताना महसूल विभागाचे मंडल अधिकारी सर्कल राजेंद्र वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस प्रशासनाच्या नियंत्रणाखाली संपूर्ण कार्यवाही करण्यात आली. पोलीस पाटील आडगाव हेही यावेळी उपस्थित होते.
सदर मृतदेह पाण्याबाहेर काढण्यासाठी वन्यजीव रक्षक मावळ संस्था, आपदा मित्र, शिवदुर्ग टीम, निलेश गराडे, गणेश निसाळ, विकी दौंडकर, शुभम काकडे, साहिल लांडगे, राहील नायर, कमल परदेशी, अनिल आंद्रे इत्यादींनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
अधिक वाचा –
– अवकाळीचा कहर..! गारपीट अन् वादळी वाऱ्यामुळे आंदर मावळ भागातील बागायतदार, फुलउत्पादक शेतकरी संकटात
– पवन मावळ भागाला अवकाळी पावसाने झोडपले, गारपिटीमुळे शेतीमालाचे मोठे नुकसान, पंचनामे त्वरित करण्याची मागणी