जुना मुंबई पुणे महामार्गावर वडगाव फाट्यापासून ते सोमाटणे फाट्यापर्यंत होणाऱ्या लहान मोठ्या अपघातांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. आज (मंगळवार, 11 एप्रिल) एकाच दिवशी तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर तीन अपघात झाले. पहिला अपघात पहाटे विजय मारुती खिंड इथे, दुसरा सकाळी लिंब फाट्यावर आणि तिसरा दुपारच्या सुमारास तळेगाव दाभाडे पोलिस चौकीसमोरच झाला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मंंगळवारी दुपारी झालेल्या अपघातात एका ऑटोरिक्षाची कंटेनरला धडक बसली. यात रिक्षाचे प्रचंड नुकसान झाले आहे. ऑटो रिक्षा क्रमांक (एम.एच. 14 जे.पी. 6558) हिने कंटेनर (क्रमांक एम.एच. 12 एफ.झेड. 4201) याला धडक दिली. यात रिक्षातील एकजण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी पवना हॉस्पिटल इथे दाखल करण्यात आले आहे. ( Accident involving auto rickshaw and container in front of Talegaon Dabhade Police Station Third accident in same day in city )
हेही वाचा – मोठी बातमी! तळेगाव खिंडीत भीषण अपघात, कामावर जात असलेला दुचाकीस्वार जागीच ठार
तळेगाव शहर आणि परिसरात इथे उड्डाणपुलाची आवश्यकता…
तळेगाव आणि शहर भागात होणारे अपघात आणि वाढती संख्या पाहता वन्यजीव रक्षक मावळच्या सदस्यांनी शहर आणि भागात काही ठिकाणी उड्डाणपुल होणे आवश्यक असल्याचे सांगत, त्याची यादीच पुढे केली आहे.
- सेंट्रल चौक, देहूरोड
- लिंब फाटा, तळेगाव दाभाडे
- चाकण फाटा, तळेगाव दाभाडे
- वडगाव कमान चौक, वडगाव
- मातोश्री हॉस्पिटल चौक, वडगाव
- शिवराज हॉटेल चौक, वडगाव
- बस स्टॉप चौक, वडगाव
- कान्हे फाटा
या ठिकाणी उड्डाणपुलाची गरज आहे, अशी माहिती निलेश संपतराव गराडे (संस्थापक वन्यजीव रक्षक मावळ संस्था), आपदा मित्र मावळ आणि शिवदुर्ग मित्र लोनावळा यांनी दैनिक मावळला दिली.
अधिक वाचा –
– पुणे जिल्ह्यातील 195 ग्रामपंचायतीतील रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर, 18 मे रोजी मतदान, पाहा संपूर्ण कार्यक्रमपत्रिका
– खेडमधील आडगाव बंधारा इथे आदिवासी तरुणाचा बुडून मृत्यू; आपदा मित्र मावळ यांना मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश