जुना मुंबई पुणे महामार्गावर आज (मंगळवार, दिनांक 11 एप्रिल) रोजी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. एका अज्ञात वाहनचालकाने दुचाकी चालकाला धडक देऊन तो तसाच पसार झाला. ही धडक इतकी भयंकर होती की यात दुचाकीस्वार जागीच मृत्यू पावला आहे. ( Biker killed in accident on old Mumbai Pune highway in Talegaon Dabhade police station limits )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अमितकुमार यादव (वय 30 वर्षे, रा. तळेगाव दाभाडे, मुळ रा. उत्तरप्रदेश) असे सदर अपघातात मृत पावलेल्या तरुणाचे माव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशनजवळीलच विजय मारुती तळेगाव दाभाडे खिंड इथे हा अपघात झाला. अमितकुमार हा सोमाटणे येथील एका नर्सरीत चालला होता. तेव्हा पहाटे साडेपाच ते सहाच्या दरम्यान हा अपघात झाला.
अमित यादव हा दुचाकी (क्रमांक एम.एच. 14 एफ.वाय. 0119) वरुन जात असताना कुणी अज्ञात वाहनाने त्याला ठोकर मारली. यात त्याच्या डोक्याच्या भागाला अतिगंभीर इजा झाली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. अधिक तपास तळेगाव दाभाडे पोलिसचे भरत वारे हे करत आहे.
अधिक वाचा –
– खेडमधील आडगाव बंधारा इथे आदिवासी तरुणाचा बुडून मृत्यू; आपदा मित्र मावळ यांना मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश
– अवकाळीचा कहर..! गारपीट अन् वादळी वाऱ्यामुळे आंदर मावळ भागातील बागायतदार, फुलउत्पादक शेतकरी संकटात