पुणे जिल्ह्यातील सुमारे 195 ग्रामपंचायतीतील 280 सदस्य आणि 10 थेट सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 18 मे 2023 रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी दिली आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
निधन, राजीनामा, अनर्हता किंवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या सदस्य आणि थेट सरपंचपदांच्या पोटनिवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार हे मतदान होत आहे. नामनिर्देशनपत्र 25 एप्रिल ते 2 मे 2023 या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत दाखल करता येतील. 29 एप्रिल, 30 एप्रिल आणि 1 मे या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत. ( By-elections announced for 195 gram panchayat vacancies in Pune district voting on May 18 see full program )
नामनिर्देशनपत्रांची छाननी 3 मे 2023 रोजी सकाळी 11 वाजेपासून होईल. नामनिर्देशनपत्रे 8 मे 2023 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी दुपारी 3 वाजेनंतर अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल आणि निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल.
दिनांक 18 मे 2023 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. नक्षलग्रस्त व दुर्गम भागात मात्र दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 19 मे 2023 रोजी होईल.
अधिक वाचा –
– खेडमधील आडगाव बंधारा इथे आदिवासी तरुणाचा बुडून मृत्यू; आपदा मित्र मावळ यांना मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश
– अवकाळीचा कहर..! गारपीट अन् वादळी वाऱ्यामुळे आंदर मावळ भागातील बागायतदार, फुलउत्पादक शेतकरी संकटात