सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्रांतीची ज्योत पेटविणारे थोर समाजसुधारक, क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांची आज (दि. 11 एप्रिल, मंगळवार) जयंती. वडगाव नगरपंचायत कार्यालयात महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ( Mahatma Jyotirao Phule birth anniversary celebrated at Vadgaon Nagar Panchayat office )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा जपत त्यांच्या पावन स्मृतीस यावेळी अभिवादन करण्यात आले. जयंतीनिमित्त वडगाव नगरपंचायत कार्यालयात महात्मा जोतिबा फुले यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष मयूर ढोरे, मुख्याधिकारी डॉ प्रविण निकम, नगरसेवक चंद्रजीत वाघमारे, किरण म्हाळसकर आणि नगरपंचायत अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
साताऱ्यातील कटगुण या गावी 11 एप्रिल 1827 रोजी जोतिबा फुले यांचा जन्म झाला होता. महात्मा फुले हे भारतीय समाज सुधारकांच्या पहिल्या पिढीतील सुधारक होते. महात्मा फुलेंनी 1848 ला पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू करुन मुलींना शिक्षणाचा हक्क मिळवून दिला. फक्त स्त्रीयांच्या शिक्षणापुरतेच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे कार्य मर्यादित नव्हते, तर फुले दाम्पत्याने विविध क्षेत्रात सुधारणेचा पाया घातला.
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशनसमोर ऑटो रिक्षा आणि कंटेनरचा अपघात; शहर भागात एकाच दिवशी तिसरा अपघात
– पुणे जिल्ह्यातील 195 ग्रामपंचायतीतील रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर, 18 मे रोजी मतदान, पाहा संपूर्ण कार्यक्रमपत्रिका