आधुनिक भारताच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असणाऱ्या आणि करोडो स्त्रियांच्या जीवनात शिक्षणाची पहाट घेऊन येणाऱ्या महान समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त मावळ तहसिल मध्ये (मंगळवार, 11एप्रिल) अभिवादन करण्यात आले. ( Mahatma Jyotirao Phule birth anniversary celebrated at Vadgaon Maval Tehsil Office )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त मावळ तहसिल कार्यालयात नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मावळ तालुका माळी समाजोन्नती मंडळांचे माजी पंचायत समिती सदस्य दत्तात्रय माळी, व्याख्याता स्नेहल बाळसराफ, खादी ग्रामोद्योग संघाचे संचालक सुदेश गिरमे, बाळासाहेब बोरावके, संजय लोणकर, योगेश माळी, रविंद्र विधाटे, रोहीत गिरमे, मयुर झोडगे, मुकुंदा माळी, आनंदा आल्हाट, एकनाथ भुजबळ, अभिजित गदादे, रामचंद्र जगताप, स्वप्निल शेवकर, ओम बोरावके आदी उपस्थित होते.
जोतिबा फुले यांचा जन्म साताऱ्यातील कटगुण या गावी 11 एप्रिल 1827 रोजी झाला होता. महात्मा फुले हे भारतीय समाज सुधारकांच्या पहिल्या पिढीतील सुधारक होते. महात्मा फुलेंनी 1848 ला पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू करुन मुलींना शिक्षणाचा हक्क मिळवून दिला. फक्त स्त्रीयांच्या शिक्षणापुरतेच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे कार्य मर्यादित नव्हते, तर फुले दाम्पत्याने विविध क्षेत्रात सुधारणेचा पाया घातला होता.
अधिक वाचा –
– वडगाव नगरपंचायत कार्यालयात महात्मा जोतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी
– पोहण्याचा मोह जीवावर बेतला! कामशेतजवळ इंद्रायणी नदीत बुडून दापोडीतील तरुणाचा मृत्यू