टेम्पो चालकाच्या निष्काळजीपणे वाहन चालवण्यामुळे एका दुचाकीस्वाराला आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना मावळ तालुक्यातील माऊ गावाच्या हद्दीत टाकवे-वडेश्वर रोडवर घडली आहे. टेम्पो आणि दुचाकीच्या धडकेत डोक्याला गंभीर इजा झाल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
याप्रकरणी छगन नामदेव लष्करी (वय 47 वर्षे व्य. शेती, रा लष्करवाडी वडेश्वर ता मावळ जि पुणे) यांनी वडगाव मावळ पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार चारचाकी टेम्पो चालक आदेश विठ्ठल धोत्रे (वय 28 वर्षे, रा नाणे कामशेत ता मावळ जि पुणे) याच्या विरोधात वडगाव मावळ पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 279, 304(अ), 337, 338, मो वा का क 184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( 34 year old biker died on spot in collision between tempo and two wheeler, an incident on takve wadeshwar road )
दिनांक 15 एप्रिल 2023 रोजी दुपारी अडीचच्या सुमारास माऊ (ता. मावळ जि. पुणे) येथील टाकवे ते वडेश्वर रोडवर हा अपघात घडला. सदर अपघातात वरसू नथू लष्करी (वय 34 वर्षे, रा लष्करवाडी वडेश्वर ता मावऴ जि पुणे) याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
फिर्यादीत नमूद, आरोपी वाहन चालक आदेश धोत्रे हा त्याच्या ताब्यातील छोटा हत्ती टेम्पो (क्रमांक MH 14 HU 7458) निष्काळजीपणे, वाहतूकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करुन व भरधाव वेगात वडेश्वर ते टाकवे असा घेऊन जात होता. तेव्हा माऊ गावच्या हद्दीत समोरुन वडेश्वर बाजकडून आलेली मोटार सायकल (क्रमांक MH 14 BE 7610) हिला समोरुन धडक देवून अपघात करुन अपघातामध्ये मोटार सायकलवरील वरसु नथु लष्करी (वय 34 वर्षे) याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मृत्यूस कारणीभुत झाला, असे फिर्यादीत नमुद आहे. त्यानुसार टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार काळे करत आहे.
यापूर्वीही झालेत असे अपघात…
दरम्यान, मयत वरसु लष्करी दुपारच्या शिफ्टसाठी कामावर जाताना हा अपघात घडला. महत्वाचे म्हणजे या वळणावर यापुर्वी देखील याच परिसरातील युवकाने आपला जीव गमावला आहे. हे वळण अपघातीवळण झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी सुचना फलक लावावे. तसेच रस्ता रुंदीकरण करण्यासाठी आमदार व खासदारांनी निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शांताराम लष्करी यांनी केली आहे.
अधिक वाचा –
– शिळींब ग्रामस्थांचा स्तुत्य निर्णय! भैरवनाथ देवाचा वार्षिक उत्सव साधेपणाने साजरा, मंदिर उभारणीसाठी करमणूकीचे कार्यक्रम रद्द
– ‘जिल्हा आदिवासी उपयोजना 2022-23 अंतर्गत मावळ तालुक्यातील 75 लाखांच्या कामांना प्रशासकीय मान्यता’ – सुनिल शेळके