व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, September 12, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

रेल्वेच्या विविध समस्यांबाबत तळेगाव भाजपाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना निवेदन; अनेक मुद्द्यांवर सकारात्मक प्रतिसाद

भारतीय जनता पार्टी तळेगाव दाभाडे शहर यांच्या वतीने नागरिकांच्या मागणीनुसार रेल्वेच्या विविध समस्या आणि प्रश्नांबाबत विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) इंदूरानी दुबे यांना निवेदन देण्यात आले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 19, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
bjp-talegaon-dabhade

Photo Courtesy : Ravindra Mane


भारतीय जनता पार्टी तळेगाव दाभाडे शहर यांच्या वतीने नागरिकांच्या मागणीनुसार रेल्वेच्या विविध समस्या आणि प्रश्नांबाबत विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) इंदूरानी दुबे यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी तळेगाव भाजपा शहराध्यक्ष रविंद्र बाळासाहेब माने, नगरसेविका शोभा भेगडे, सरचिटणीस शोभा परदेशी, उपाध्यक्ष हिम्मतभाई पुरोहित, ओबीसी मोर्चा अध्यक्ष नितीन पोटे, सोशल मीडिया अध्यक्ष उपेंद्र खोल्लम, व्यापारी आघाडी कार्याध्यक्ष सागर शर्मा, ओबीसी मोर्चा प्रसिद्धी प्रमुख अमित भागिवंत हे उपस्थित होते. ( talegaon bjp letter to DRM indurani dube regarding various railway issues )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

निवेदनामध्ये केलेल्या मागण्या आणि त्यावर मिळालेले उत्तर…

पुण्याप्रमाणेच तळेगाव दाभाडे शहर हे पेन्शनरांचे आणि सेकंड होम घेऊ इच्छिणाऱ्यांचे पसंतीचे शहर आहे. या ठिकाणी अनेक ज्येष्ठ नागरिक तसेच काहीना काही शारीरिक आजार व व्यंग असलेल्या लोकांसाठी तळेगाव दाभाडेे स्टेशन आणि घोरावाडी स्टेशनला सरकते जिने (Escalator) बसवण्यात यावेत, या मागणीवर तळेगाव दाभाडे स्टेशन येथे सरकते जिने बसवण्याचे मान्य केले.

तळेगाव दाभाडे हे एक महत्वाचे शहर आहे. याठिकाणी एम.आय.डी.सी. (MIDC) असल्याने अनेक प्रवासी या स्टेशन वरून ये जा करत असतात. चाकण-खेड भागातील प्रवासी सुध्दा येथुन प्रवास करत असतात. यासाठी मुंबई पुणे सिंहगड एक्सप्रेस याचा तळेगाव दाभाडे स्टेशन इथे थांबवावी, या मागणीवर सर्व बाबींचा विचार करून थांबा देण्याचे आश्वासन दिले. तसेच पुणे जोधपूर एक्सप्रेस रोज सुरू करावी यावर वरिष्ठ पातळीवर प्रस्ताव पाठवू असे सांगितले.

मुंबई पुणे कोल्हापुर सह्याद्री एक्प्रेस ही गाडी सर्वांच्या सोयीची आणि कायम गर्दी असणारी गाडी आहे. या गाडीने जास्त करून पास होल्डर प्रवास करत असतात. कोरोना काळामध्ये ही गाडी बंद केल्यापासून अनेकांंची गैरसोय होत आहे. ही गाडी पुन्हा चालु करावी. यावर कोल्हापूर – पुणे सहयाद्री एक्स्प्रेस चालू करणार आहोत. आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या व्यापक विकासाचे काम चालू होणार आहे. त्यामुळे त्यावरील लोड कमी व्हावा यासाठी सध्या पुण्यापर्यंत सुरु होईल असे सांगितले.

कोरोना काळात लोणावळा-पुणे दरम्यानच्या लोकल बंद केल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. बस आणि गाडी सारखा महागडा पर्याय लोकांना वापरावा लागत आहे. तरी या सर्व लोकल गाड्या पुर्ववत चालु कराव्यात. यामध्ये विशेषतः दुपारी पुण्याला जायला आणि पुण्याहून यायला लोकल नसल्यामुळे चाकरमानी व विद्यार्थी-विद्यार्थिनींना प्रचंड त्रास सहन करावा लागतो.

लोणावळा पुणे लोणावळा लोकल प्रवाशांंची संख्या पाहता या दरम्यानच्या सर्व लोकल पूर्ववत करून लोकलच्या फेऱ्या वाढवाव्यात. यावर या मार्गावरील ट्रॅक खूप जुने असल्यामुळे सातत्याने ट्रॅकचा मेंटेनन्स करणे गरजेचे आहे. प्रवाशांची सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे त्यामुळे या मार्गावर किमान 3 तास मेंटेनन्स साठी आवश्यक आहेत. त्यामुळे सध्यातरी लोकल चालू करणे शक्य नाही असे स्पष्ट केले.

प्रत्येक लांब पल्ल्याच्या गाडीच्या आधी कनेक्टींग लोकल असावी जेणेकरून मधल्या स्टेशन वरील प्रवाशांंना लांब पल्ल्याची गाडी पकडणे सोयीचे होईल. महिला डब्यात पोलीस कर्मचारी तैनात करावेत आणि घोरावाडी रेल्वे स्टेशन येथे RPF केन्द्र सुरू करावे. या दोन्हींवर सकारात्मक पाऊले उचलली जातील हे सांगितले.

अधिक वाचा –
– जवणच्या घाटात ब्रेक फेल लालपरीचा थरार! बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचला प्रवाशांचा जीव
– ‘जीवात जीव तोवर राष्ट्रवादीतच…कुणाच्याही सह्या घेतलेल्या नाहीत…माझ्याविषयी होत असलेल्या चर्चांमध्ये तथ्य नाही’ – अजित पवार


dainik maval jahirat

Previous Post

मावळ तालुक्यातील 9 ग्रामपंचायतींमधील रिक्त जागांसाठी 18 मे रोजी निवडणूक

Next Post

रबरासारखं शरीर असलेले चिमुकले योगा मास्टर्स आर्यन अन् वेदांगी; राज्यभर गाजवतायेत मावळ तालुक्याचं नाव

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
yogmastersaryan-yogmastersvedangi

रबरासारखं शरीर असलेले चिमुकले योगा मास्टर्स आर्यन अन् वेदांगी; राज्यभर गाजवतायेत मावळ तालुक्याचं नाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.