संत शिरोमणी श्री गोरोबाकाका यांचा 706 वा पुण्यतिथी सोहळा तळेगाव दाभाडे इथे मोठ्या उत्साहात पार पडला.
श्री संत गोरोबा काका यांच्या 706 पुण्यतिथी निमित्त तळेगाव दाभाडे इथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी (दिनांक 18 एप्रिल) अर्थात चैत्र वैद्य 13 शके 1945 रोजी तळेगाव दाभाडे येथील कुंभारवाडा इथे हा सोहळा संपन्न झाला. यावेळी विविध क्षेत्रातील नेते, पदाधिकारी आणि मावळ तालुक्यातील कुंभार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
यंदा कार्यक्रमाची रुपरेषा ही सोमवार सायंकाळपासून आखण्यात आली होती. सोमवारी (17 एप्रिल 2023) सायंकाळी गोरोबाकाकांच्या नवीन पादुकांचे आणि मूर्तीचा आगमन सोहळा झाला. यावेळी भजन आणि हरिनामाचा जयघोष करण्यात आला. त्यानंतर मंगळवारी (दिनांक 18 एप्रिल) पहाटे पाच वाजल्यापासून काकड आरती, महाभिषेक आणि पूजा असे विविध कार्यक्रम पार पडले. ( Shri Sant Goroba Kaka 706th death anniversary Talegaon Dabhade maval )
दुपारी पालखीचे पूजन करून पालखीची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पालखी मिरवणूक दिंडी सोहळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक सामील झाले होते. त्यानंतर हभप श्री एकनाथ महाराज विश्वनाथ लिंबोरे यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. अखेरीस महाप्रसाद आणि हरिजागर याने कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली. श्री संत गोरोबाकाका सेवा मंडळ कुंभारवाडा तळेगाव दाभाडे यांनी व्यवस्थापक म्हणून काम पाहिले.
दैनिक मावळ – विशाल कुंभार (संपादक)
अधिक वाचा –
– देव तारी त्याला कोण मारी! खंडाळ्यात ट्रेकिंग दरम्यान दरीत कोसळलेल्या ओडिशाच्या ‘हरिश्चंद्र’ला रेस्क्यू टीम्सकडून जीवदान
– मावळ कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत भाजपा आणि काँग्रेसची युती? राज्यात होतेय चर्चा! एकूण 40 उमेदवार रिंगणात