शेती व्यवसायाचा सन्मान म्हणून सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत राज्यातील 1 कोटी 10 लाख 39 हजार शेतकऱ्यांना 23 हजार कोटी रुपये इतका लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती योजनेचे अंमलबजावणी प्रमुख तथा कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
या योजनेंतर्गत सर्व पात्र शेतकरी कुटुंबास म्हणजे पती, पत्नी व 18 वर्षांखालील अपत्यांना रुपये 2 हजार प्रती हप्ता याप्रमाणे 3 हप्त्यात रुपये 6 हजार दरवर्षी लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येतो. लाभार्थ्यांनी संबंधित तहसिलदार तथा तालुका नोडल अधिकाऱ्यांकडून भूमि अभिलेख नोंदी अद्ययावत करुन घ्याव्यात.
तसेच, पीएम किसान पोर्टलवरील http://pmkisan.gov.in या लिंकच्या आधारे केवायसी पडताळणी करावी. या योजनेतील लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी देखील पात्र राहतील. उपमुख्यमंत्री महोदयांनी अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे या शेतकऱ्यांना 6 हजार रुपये अधिकचे मिळणार आहेत. त्यांच्या खात्यात एकूण 6 अधिक 6 असे 12 हजार रुपये जमा होतील, अशी माहिती देखील आयुक्त चव्हाण यांनी दिली. ( Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana 1 Crore 10 Lakh Beneficiary Farmers In Maharashtra 14th Installment Will Come Soon )
यात केंद्र शासनाकडून योजनेच्या एप्रिल ते जुलै 2023 या कालावधीतील 14 वा हप्ता मे महिन्यात देण्यात येणार आहे. या हप्त्यासाठी लाभार्थ्यांच्या भूमि अभिलेख नोंदी पोर्टलवर अद्यावत करणे, बँक खाती आधार क्रमांकास जोडणे व ई केवायसी प्रमाणीकरण करणे आदी बाबींची पूर्तता 30 एप्रिल 2023 पूर्वी करावी, असे आवाहन कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे.
अधिक वाचा –
– चोरीला गेलेली ‘लक्ष्मी’ अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पुन्हा दारी; वडगाव मावळ पोलिसांकडून 32 वाहने मूळ मालकांना सुपूर्द
– पुण्यात उबेरसह ‘या’ चार कंपन्यांना तीनचाकी ऑटोरिक्षा ‘ॲग्रीगेटर लायसन्स’ नाकारले
– मावळ कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक 2023 : महाविकास आघाडीच्या पॅनलचा प्रचाराचा शुभारंभ अन् विजयाचा ‘एल्गार’