पुणे : मुंबई-बंगळुरु महामार्गावर कात्रजजवळील नवले पुलाजवळ रविवारी (दिनांक 22 एप्रिल) भीषण अपघात झाला. नवले पुलाजवळ असलेल्या स्वामी नारायण मंदिर इथे साखरेची पोती वाहणारा ट्रक आणि खासगी ट्रॅव्हल्स बस यांच्यात अपघात झाला. ज्यात 4 जणांचा मृत्यू झाला असून तर 22 जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
शनिवारच्या मध्यरात्री रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास पुणे-बंगलोर महामार्गावर हा अपघात झाला. खाजगी बस (क्रमांक एमएच 03 सी.पी. 4409) ही एका ट्रॅव्हल्स कंपनीची बस कोल्हापूर ते डोंबिवली असा प्रवास करत होती. यावेळी मालवाहतूक करणाऱ्या ट्रक (क्रमांक एमएच 10 सी.आर. 1224) यामधे मोठ्या प्रमाणात साखरेची पोती भरलेली होती. यावेळी ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्याने बसला पाठीमागून धडक दिल्याने अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.
अपघाताची माहिती मिळताच बचाव यंत्रणा आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. वैद्यकीय आपत्कालीन सेवा दलाने घटनास्थळी पोचून मदतकार्य सुरु केले. सदर अपघातामुळे महामार्गावर काहीकाळ मोठी वाहतूक कोंडी झाली होती. ( 4 dead and 22 injured in truck bus collision at Pune Maharashtra )
अधिक वाचा –
– प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा महाराष्ट्रातील 1 कोटी 10 लाख शेतकऱ्यांना लाभ; ‘या’ दिवशी मिळणार 14वा हप्ता
– चोरीला गेलेली ‘लक्ष्मी’ अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पुन्हा दारी; वडगाव मावळ पोलिसांकडून 32 वाहने मूळ मालकांना सुपूर्द