कामशेत रेल्वे स्टेशनवर आज (रविवार, दिनांक 23 एप्रिल) रोजी दुपारच्या सुमारास हत्या झालेल्या स्वरुपात आढळलेल्या युवकाच्या मारेकऱ्याचा तपास अवघ्या एका तासात लावण्याची कामगिरी कामशेत पोलिसांनी केली आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; आज (रविवार) दिनांक 23 एप्रिल 2023 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास कामशेत रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवर कठड्यावर एक 22 ते 25 वयोगटातील व्यक्तीचा खून करून मृतदेह मृत अवस्थेत मिळाला होता. सदर मयताचा आणि मयताचा खून करणाऱ्या आरोपीचा तपास सहा पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली कामशेत पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी पोलिस निरिक्षक संजय जगताप, सहा. फौजदार अब्दुल शेख, सहा.फौजदार समीर शेख, पोलीस हवालदार श्री गणेश तावरे, श्री सुहास सातपुते, एस डोईफोडे, होमगार्ड सुधीर घारे या पथकाने शीघ्रगतीने केला.
पथकाने अवघ्या एका तासात मारेकरी आरोपी संतोष महादेव घाटे (सध्या राहणार फिरिस्ता कामशेत तालुका मावळ जिल्हा पुणे, मुळगाव अमरावती) याला कामशेत परिसरात शोध घेऊन शिताफीने ताब्यात घेतले. तसेच त्याच्यासोबत इतर दोन साथीदार असल्याबाबत समजत आहे. तसेच खून झालेल्या व्यक्तीची तात्काळ व्हाट्सअप वर आणि मोबाईलवर सर्वत्र माहिती पाठवून त्याची ओळख पटवण्यात आली आहे.
हेही वाचा – मोठी बातमी! पवना धरणात युवक बुडाला, आपदा मित्रांकडून सर्च ऑपरेशन सुरु
सदर खून झालेल्या व्यक्तीचे नाव विजय सतू भोंडवे (वय 22 राहणार भाजगाव गाव तालुका मावळ जि पुणे) असे आहे. त्याबाबत आरपीएफ पोलीस स्टेशन चिंचवड या ठिकाणी गुन्हा दाखल होत आहे. आरोपी संतोष महादेव घाटे यास स्थानिक गुन्हे शाखा लोहमार्ग पुणे यांचे ताब्यात देण्यात आलेले आहे. पुढील सदर खुनाचा तपास आर पी एफ हे करत आहेत.
अधिक वाचा –
– चोरीला गेलेली ‘लक्ष्मी’ अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पुन्हा दारी; वडगाव मावळ पोलिसांकडून 32 वाहने मूळ मालकांना सुपूर्द
– प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा महाराष्ट्रातील 1 कोटी 10 लाख शेतकऱ्यांना लाभ; ‘या’ दिवशी मिळणार 14वा हप्ता