व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी! रेल्वे स्टेशनवर खून झालेल्या युवकाच्या मारेकऱ्याला एका तासात गजाआड करण्यात कामशेत पोलिसांना यश

कामशेत रेल्वे स्टेशनवर आज (रविवार, दिनांक 23 एप्रिल) रोजी दुपारच्या सुमारास हत्या झालेल्या स्वरुपात आढळलेल्या युवकाच्या मारेकऱ्याचा तपास अवघ्या एका तासात लावण्याची कामगिरी कामशेत पोलिसांनी केली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 23, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
kamshet-police

Photo Courtesy : Ganesh Taware


कामशेत रेल्वे स्टेशनवर आज (रविवार, दिनांक 23 एप्रिल) रोजी दुपारच्या सुमारास हत्या झालेल्या स्वरुपात आढळलेल्या युवकाच्या मारेकऱ्याचा तपास अवघ्या एका तासात लावण्याची कामगिरी कामशेत पोलिसांनी केली आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; आज (रविवार) दिनांक 23 एप्रिल 2023 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास कामशेत रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवर कठड्यावर एक 22 ते 25 वयोगटातील व्यक्तीचा खून करून मृतदेह मृत अवस्थेत मिळाला होता. सदर मयताचा आणि मयताचा खून करणाऱ्या आरोपीचा तपास सहा पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली कामशेत पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी पोलिस निरिक्षक संजय जगताप, सहा. फौजदार अब्दुल शेख, सहा.फौजदार समीर शेख, पोलीस हवालदार श्री गणेश तावरे, श्री सुहास सातपुते, एस डोईफोडे, होमगार्ड सुधीर घारे या पथकाने शीघ्रगतीने केला.

पथकाने अवघ्या एका तासात मारेकरी आरोपी संतोष महादेव घाटे (सध्या राहणार फिरिस्ता कामशेत तालुका मावळ जिल्हा पुणे, मुळगाव अमरावती) याला कामशेत परिसरात शोध घेऊन शिताफीने ताब्यात घेतले. तसेच त्याच्यासोबत इतर दोन साथीदार असल्याबाबत समजत आहे. तसेच खून झालेल्या व्यक्तीची तात्काळ व्हाट्सअप वर आणि मोबाईलवर सर्वत्र माहिती पाठवून त्याची ओळख पटवण्यात आली आहे.

हेही वाचा – मोठी बातमी! पवना धरणात युवक बुडाला, आपदा मित्रांकडून सर्च ऑपरेशन सुरु

सदर खून झालेल्या व्यक्तीचे नाव विजय सतू भोंडवे (वय 22 राहणार भाजगाव गाव तालुका मावळ जि पुणे) असे आहे. त्याबाबत आरपीएफ पोलीस स्टेशन चिंचवड या ठिकाणी गुन्हा दाखल होत आहे. आरोपी संतोष महादेव घाटे यास स्थानिक गुन्हे शाखा लोहमार्ग पुणे यांचे ताब्यात देण्यात आलेले आहे. पुढील सदर खुनाचा तपास आर पी एफ हे करत आहेत.

अधिक वाचा –
– चोरीला गेलेली ‘लक्ष्मी’ अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पुन्हा दारी; वडगाव मावळ पोलिसांकडून 32 वाहने मूळ मालकांना सुपूर्द
– प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा महाराष्ट्रातील 1 कोटी 10 लाख शेतकऱ्यांना लाभ; ‘या’ दिवशी मिळणार 14वा हप्ता


dainik maval jahirat

Previous Post

मोठी बातमी! पवना धरणात युवक बुडाला, आपदा मित्रांकडून सर्च ऑपरेशन सुरु

Next Post

जमिनीची खरेदी-विक्री करताना ‘या’ 5 गोष्टी जरूर तपासा, अन्यथा भविष्यात येऊ शकतात अनेक अडचणी; वाचा सविस्तर

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
buying-and-selling-land

जमिनीची खरेदी-विक्री करताना 'या' 5 गोष्टी जरूर तपासा, अन्यथा भविष्यात येऊ शकतात अनेक अडचणी; वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.