वडगाव मावळ पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेले पोलीस अंमलदार पोलिस हवालदार अमोल प्रकाशराव कसबेकर यांना पोलीस दलातील उल्लेखनीय गुणवत्तापूर्वक प्रशांसनिय कामगीरी बाबत पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांचे पदक जाहीर झाले आहे. पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी परिपत्रकाद्वारे आज (बुधवार, दिनांक 26 एप्रिल) पुरस्कारांची घोषणा केली. पुणे ग्रामीण पोलीस दलातील 3 पोलीस अंमलदारांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पोलीस हवालदार अमोल प्रकाशराव कसबेकर हे सन 2004 मध्ये पुणे ग्रामीण पोलीस दलामध्ये भरती झाले असून, त्यांनी जिल्हा वाहतुक शाखा, इंदापूर आणि लोणावळा शहर पोलीस स्टेशन इथे सेवा बजाविलेली आहे. त्यांचा गंभीर गुन्ह्यांचे कागदपत्रे आणि दोषारोपपत्रे तयार करण्यामध्ये हातखंडा असून, त्यांनी सेवाकालाववधीमध्ये अनेक गंभीर गुन्हयांचा तपास केला आहे. गंभीर आणि क्लिष्ट गुन्ह्यांचे तपासकार्यामध्ये सह तपासिक अधिकारी म्हणुन उत्कृष्ट कामकाज केलेले आहे. ( vadgaon maval police constable amol kasbekar has been announced director general of police medal )
कसबेकर यांनी आजपावेतो खून, बलात्कार या सारख्या गंभीर गुन्ह्यांचे केलेले तपासकार्यामध्ये न्यायालयामध्ये आरोपींस शिक्षा झालेल्या आहेत. तसेच त्यांचे वकृत्व कौशल्य व जनमाणसामध्ये अतिशय चांगली प्रतिमा आहे. यासर्व कार्याची दखल घेवुन पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी अमोल कसबेकर यांचे नावाची शिफारस केलेली होती. पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. दिनांक 1 मे, महाराष्ट्र दिनी पोलीस परेडमध्ये त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे.
पोलिस हवालदार अमोल कसबेकर यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर झाल्याने पोलीस अधीक्षक अंकित गोयल, लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
दैनिक मावळ – विशाल कुंभार (संपादक)
अधिक वाचा –
– वडगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बंधारा आणि पंप हाऊसची उपनगराध्यक्षा सायली म्हाळसकरांनी केली पाहणी
– मौजे जांबवडे गावात नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन आणि विविध विकास कामांचे लोकार्पण