जर्मनीच्या एफइव्ही स्मार्ट मोबीलिटी सेंटर या इंटरनॅशनल कंपनीने मावळ तालुक्यात गेल्या दोन वर्षांपूर्वी 30 जिल्हा परिषद शाळांचे सर्वेक्षण केले होते. त्या सर्वेक्षण या कंपनीने तीन शाळांची निवड केली, त्यात वडगाव येथील केशवनगर मधील जिल्हा परिषद शाळा, कदमवाडी व दानवेवस्ती या तीन जिल्हा परिषद शाळा आहेत.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
जर्मनीच्या एफइव्ही स्मार्ट मोबीलिटी सेंटर या इंटरनॅशनल कंपनीने केशवनगर येथील जिल्हा परिषद शाळा घेतली दत्तक घेतली आहे. यावेळी जर्मनीच्या एफइव्ही स्मार्ट मोबीलिटी कंपनीचे एच आर हेड स्टीफन ब्रँण्ड, व्हॉइस प्रेसिडेंट युहान च्युव्हाँचर, एच आर मॅनेजर अनुजा सेठी, जि. प. मुख्याध्यापिका सुषमा घोरपडे, जि. प. शिक्षिका छाया जाधव तसेच विद्यार्थी, पालक आणि या कंपनीची संपूर्ण टिम देखील उपस्थित होती. ( Officials from Germany visit Zilla Parishad Primary School at Vadgaon Maval )
या कंपनीच्या सीएसआर फंडातून गेल्या काही कालावधीत केशवनगर येथील जिल्हा परिषद शाळेचे आवारात ब्लॉक बसवणे, फ्लोरिंग बदलणे वॉल पेंटिंग करणे, बाथरूम दुरुस्ती वॉटरप्रूफिंग अशी अनेक कामे करण्यात आली आहेत. याशिवाय या कंपनीच्या माध्यमातून यावर्षी या तीनही शाळा डिजिटल करण्यात येणार येईल असा मानस त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी मुख्याध्यापिका सुषमा घोरपडे व शिक्षका छाया जाधव यांनी या मान्यवरांचे आदर आदरपूर्वक स्वागत करत आभार व्यक्त केले.
अधिक वाचा –
– मावळ कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत 98.27 टक्के मतदान; 1,590 मतदारांनी बजावला हक्क, शनिवारी मतमोजणी
– पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर 12 वाहनांचा विचित्र अपघात, पाहा भयंकर व्हिडिओ