मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या इंद्रायणी नदीवरील वाडीवळे पुलाच्या कामास सुरुवात करण्यात आली. आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत भूमीपूजन संपन्न झाले. पावसाळ्यात पुल पाण्याखाली जात असल्यामुळे वाडीवळे, वळक, मुंढावरे, बुधवडी, सांगिसे, वेल्हवळी, नेसावे, खांडशी, उंबरवाडी येथील ग्रामस्थांचा मुख्य बाजारपेठेशी संपर्क तुटत होता. ( work of bridge at vadiwale on indrayani river has been started bhoomipujan by MLA Sunil Shelke )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
नागरिकांना लांबून वळसा मारुन जावे लागत असल्यामुळे शालेय विद्यार्थी, दुध व्यावसायिक, शेतकरी यांचे यामुळे मोठे नुकसान होत होते. इथे नवीन पुल बांधण्यासाठी सुमारे 5 कोटी 85 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून कामास देखील स्थानिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. पुलाचे काम लवकरात लवकर पुर्ण होऊन ग्रामस्थांचा अनेक वर्षांपासूनचा प्रश्न सुटणार आहे. या कामासाठी निधी उपलब्ध करु शकलो याचे समाधान आहे, असे आमदार सुनिल शेळके म्हणाले.
दैनिक मावळ – विशाल कुंभार (संपादक)
अधिक वाचा –
– ‘भावी मुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार’, मावळ तालुक्यात कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी, सर्वत्र चर्चा
– फिरायला जाताय? ट्राफिकमध्ये अडकाल… घाटात वाहनांच्या रांगाच रांगा । Mumbai Pune Expressway Traffic Jam