तळेगाव दाभाडे येथील ॲड. पु. वा. परांजपे विद्या मंदिरामध्ये 1 मे अर्थात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच यावेळी शिक्षण महर्षी, मावळ भूषण कृष्णराव भेगडे यांच्या मार्गदर्शनातून ॲड. पु. वा परांजपे विद्या मंदिरात सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवण्यात आला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
1 मे निमित्त ध्वजारोहण आणि सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन संस्थेचे सचिव संतोष खांडगे, शाळेचे माजी विद्यार्थी अविनाश बवरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सहसचिव शालेय समिती अध्यक्ष नंदकुमार शेलार, संस्थेचे संचालक महेश शहा, दामोदर शिंदे, सोनबा गोपाळे, शालेय समिती सदस्य अशोक काळोखे, आनंद भेगडे, ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर तुमकर, माजी विद्यार्थी अंकुश गुंड, दीपक अवसरकर उपस्थित होते. दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मोगऱ्याची रोपे देऊन सर्व मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. ( Inauguration of Solar Power Generation Project at Ad P V Paranjpe Vidya Mandir Talegaon Dabhade )
प्रमुख अतिथी माजी विद्यार्थी अविनाश बवरे यांनी आपल्या मनोगतात सौर ऊर्जा ही काळाची गरज आहे. तसेच माजी विद्यार्थी या नात्याने सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन करण्याची व ध्वजारोहण करण्याची संधी दिली, त्याबद्दल आनंद व्यक्त केला. संस्थेचे सचिव संतोष खांडगे यांनी विद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला, तसेच 1 मे आणि अमृत महोत्सवी वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
संस्थेचे सहसचिव व शालेय समिती अध्यक्ष यांनी देखील सर्वांना 1 मे च्या शुभेच्छा दिल्या आणि लवकरच अमृत महोत्सव कार्यक्रम साजरा होणार आहे, याबद्दल माहिती दिली. शालेय समितीचे सदस्य अशोक काळोखे यांनी कामगार दिनाच्या सर्व अध्यापकांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग पोटे यांनी केले. तर आभार पर्यवेक्षक पांडुरंग कापरे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ अध्यापिका अनिता नागपुरे यांनी केले.
अधिक वाचा –
– महाराष्ट्र दिनासह कामगार दिनाचे औचित्य साधून वडगाव मावळ इथे श्रमिक कामगार संघटनेची स्थापना
– मावळमधील पहिला ‘आपला दवाखाना’ तळेगावमध्ये सुरु, बाळा भेगडेंच्या हस्ते उद्घाटन, मुख्यमंत्र्यांकडून ऑनलाईन शुभारंभ